ईशा अंबानी यांच्या एका बॅगच्या किंमतीत सर्वसामान्य माणूस घर घेऊ शकतो, ब्रँन्ड एवढीच किंमत
एका छोट्या बॅगसाठी ईशा अंबानी मोजतात इतकी मोठी रक्कम... एवढ्या पैशात येईल एक घर, 'त्या' बॅगची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्... पाहा ईशा अंबानी यांची महागडी बॅग
Isha Ambani : देशाचे सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांच्या कुटुंबाची चर्चा कायम सर्वत्र रंगलेली असते. अंबानी कुटुंब देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. अंबानी कुटुंबाची प्रत्येक गोष्ट सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अंबानी कुटुंबाच्या महागड्या वस्तू संपूर्ण जगाला हैराण करतात. अंबानी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती महागड्या वस्तू वापरतात आणि रॉयल आयुष्य जगतात. कोणत्याही कार्यक्रमात अंबानी कुटुंब सिंपल दिसत असलं तरी, त्यांची प्रत्येक वस्तू प्रचंड महागडी असते. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्या महागड्या वस्तूंची तर कायम चर्चा रंगत असते. पण नीता यांच्यापेक्षा अधिक महागड्या वस्तू ईशा अंबानी यांच्याकडे आहेत.
ईशा अंबानी यांनी अभिनेत्री किआरा अडवाणी आणि अभिनेत्री सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नात पती आनंद पिरामल यांच्यासोबत प्रवेश केला. तेव्हा ईशा अंबानी यांच्या हातात गुलाबी रंगाची एक छोटी बॅग होती. पण या छोट्या बॅगसाठी ईशा अंबानी यांनी लाखो रुपये मोजले आहेत. सध्या सर्वत्र ईशा अंबानी यांच्या बॅगची चर्चा रंगत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ईशा अंबानी यांच्या हातात असलेल्या छोट्या गुलाबी बॅगची किंमत जवळपास ३२ लाख रुपये आहे. ईशा अंबानी यांच्या एक बॅगच्या किंमतीमध्ये सर्वसामान्य माणूस एक वन आरके घर तर नक्की खरेदी करु शकतो. सध्या सर्वत्र ईशा अंबानी यांच्या बॅगची चर्चा रंगत आहे.
View this post on Instagram
किआरा – सिद्धार्थ यांच्या लग्नात घेतलेल्या ईशा अंबानी यांची छोटी बॅग लग्जरी ब्रँड ‘Hermes Paris’ ची असल्याचं सांगण्यात येत आहे. बॅगची किंमत ३८,५५० अमेरिकन डॉलर म्हणजे ३१ लाख ७० हजार रुपये एवढी आहे. ‘केली 20 मिनी सेलियर बॅग’ गुलाबी रंगाच्या लेदरमध्ये बनवण्यात आली आहे. ज्यामुळे छोटी बॅग देखील रॉयल दिसत आहे.
ईशा अंबानी कायम त्यांच्या महागड्या वस्तूमुळे चर्चेत असतात. आकाश – श्लोका यांच्या साखपुड्यात ईशा यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या. यामागे कारण होतं ईशा यांचा सुंदर आणि महागडा ड्रेस. आकाश – श्लोका यांच्या साखपुड्यात घातलेल्या ईशा अंबानी यांच्या ड्रेसची किंमत दहा, वीस लाख रुपये नसून ७ लाख ८७ हजार ३०० इतकी होती.
ईशा अंबानी कायम त्यांच्या खासगी आणि महागड्या वस्तूंमुळे चर्चेत असतात. ईशा अंबानी यांचं देखील लग्न झालं आहे. ईशा यांचे पती आनंद पिरामल देखील मोठे उद्योजक आहेत. ईशा आणि आनंद यांनी जुळी मुलं आहेत. ईशा आणि आनंद यांची चर्चा देखील कायम रंगत असते. शिवाय त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.