Bigg Boss 17 : ‘इज्जत घालवायला आली की…’, ईशा मालवीय हिचे वडील असं का म्हणाले?
Bigg Boss 17 : 'सलमान सरांनी सांगितलं आहे, तसं कर... याठिकाणी 'इज्जत घालवायला आली की...', समर्थ याला पाहाताच ईशा वडिलांची अशी प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही देखील म्हणाल...
मुंबई | 14 जानेवारी 2024 : ‘बिग बॉस 17’ सध्या तुफान चर्चेत आहे. शोचा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, शोमध्ये सध्या फॅमिली विक सुरु आहे. ‘बिग बॉस’ मधील अनेक स्पर्धकांच्या कुटुंबियांनी ‘बिग बॉस’मध्ये हजेरी लावली. आता प्रोमोमध्ये ईशा मालवीय हिच्या वडिलांनी ‘बिग बॉस’ मध्ये एन्ट्री होताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा आणि तिच्या वडिलांची चर्चा रंगली आहे. ईशा आणि समर्थ यांच्यामध्ये असलेल्या नात्यावर देखील ईशा हिच्या वडिलांनी मोठं वक्तव्य केलं आहे…
‘बिग बॉस’ फॅमिली विकमध्ये वडिलांना पाहाताच ईशा भावुक होत रडू लागते. अनेक दिवसांनंतर लेकीला पाहिल्यानंतर ईशा हिचे वडील देखील रडू लागतात. तेव्हा समर्थ देखील त्याठिकाणी येतो. तेव्हा ईशा हिने वडील समर्थ याला भेटतात आणि बाजूला होतात. एवढंच नाही तर नाव न घेता घरातील दोन व्यक्तींपासून दूर राहा असा सल्ला देखील ईशाला वडिलांनी दिला.
View this post on Instagram
ईशा हिचे वडील पुढे म्हणाले, ‘गेम लवकरच संपणार आहे. तुला काय वाटतं कोण जास्त प्रभावित करतं घरात.. किंवा असं कोण आहे, तुला ज्यांचं ऐकायचं नसतं तरी देखील तुला ऐकावं लागतं… ?’ वडिलांच्या प्रश्नावर उत्तर देत ईशा अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचं नाव घेते..
विकी – अंकिता यांचं नाव घेतल्यानंतर ईशा हिचे वडील म्हणाले, ‘पुढे खेळण्यासाठी तुला कोणाची गरज आहे का. सलमान सरांनी सांगितलं आहे त्या दोन लोकांपासून दूर राहा आणि स्वतःचा गेम खेळ… कोणाच्या एन्ट्रीनंतर सतत भांडणं कशाला…’
त्यानंतर ईशा हिच्या वडिलांनी आयेशा हिच्या एन्ट्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. यावर ईशी म्हणाली, ‘मुनव्वर याच्यासाठी आली आहे…’ पुढे ईशा हिच्या वडिलांनी आयेशा आणि स्वतःच्या लेकीला चेतावनी दिली. ‘याठिकाणी इज्जत घालवायला आली आहे, की गमवायला…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा आणि तिच्या वडिलांची चर्चा रंगली आहे.
समर्थ याचे वडील काय म्हणाले होते?
समर्थ – ईशा यांच्या रोमान्सवर समर्थ याचे वडील म्हणाले, ‘मला कसलीही लाज वाटत नाही. कारण सर्वकाही नॅचरल आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर तर काय – काय येत आहे. आपण तर कपलला पाहात आहोत. दोन्ही मुलं एकमेकांवर प्रेम करतात. दोघांमध्ये जे काही आहे, ते फेक नाही…’ एवढंच नाही तर मी ईशा – समर्थ यांच्यासोबत आहे… असं देखील समर्थ याचे वडील म्हणाले होते.