भिडू फिर मोटी मत हो… जग्गू दादाचा स्मृती ईराणी यांना फिटनेसचा सल्ला काय?

Smriti Irani Diet Advice : 'बेहेन वजन कम कर...', जॅकी श्रॉफ यांचा स्मृती ईराणी यांना फिटनेसचा सल्ला, काय खावं आणि काय खाऊ नये? वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त स्मृती ईराणी आणि जॅकी श्रॉफ यांची चर्चा...

भिडू फिर मोटी मत हो... जग्गू दादाचा स्मृती ईराणी यांना फिटनेसचा सल्ला काय?
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 1:01 PM

मुंबई | 14 डिसेंबर 2023 : अभिनेत्री आणि भाजप नेत्या स्मृती ईराणी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. एक काळ असा होता, जेव्हा टीव्ही विश्वावर स्मृती यांचं राज्य होतं. आज स्मृती अभिनय क्षेत्रात सक्रिय नसल्या तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. एवढंच नाही तर, झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटींसोबत आजही त्यांचे नाते-संबंध घट्ट आहेत. नुकताच त्यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये स्मृती ईराणी आणि अभिनय विश्वातील सेलिब्रिटींसोबत असलेलं त्यांचं घट्ट नातं दिसून आलं. स्मृती ईराणी यांनी दोन फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. अभिनेते जॅकी श्रॉफ आणि निर्माते जेडी मजेठिया यांच्यासोबत स्मृती यांनी काही फोटो पोस्ट केले आहेत.

तीन सेलिब्रिटींना एकत्र पाहून चाहत्यांना आनंद तर झालाच, पण स्मृती ईराणी यांनी लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फोटो पोस्ट करत स्मृती ईराणी कॅप्शनमध्ये म्हणाल्या, ‘डायटच्या सल्ल्याचे दोन प्रकार… प्रचंड मेहनत पण चमत्कार नाही.. भीडू वजन कमी कर… स्वतःला फिट ठेव, फॅट नको होऊ रे… अंड खा, वांगी खा.. ब्रेड नको खाऊ रे… बहिणी वजन कमी कर… डायट कर कोणाला माहिती पडणार नाही…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त स्मृती ईराणी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

स्मृती ईराणी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, एक काळ असा होता जेव्हा स्मृती इराणी टीव्ही विश्वावर राज्य करत होत्या. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ सिनेमात त्यांनी तुलसी ही भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अनेक वर्ष मालिकेने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता स्मृती इराणी राजकारणात सक्रिय आहेत. आज स्मृती ईराणी अभिनय क्षेत्रात सक्रिय नसल्या तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

स्मृती ईराणी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्मृती ईराणी महत्त्वाच्या घडामोडी आणि आयुष्यातील अमुल्य क्षण चाहत्यांसोबत शेअर करतात. सोशल मीडियावर स्मृती ईराणी यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. स्मृती ईराणी चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.