Rakhi Sawant | आईच्या निधनानंतर राखी सावंतच्या व्हिडीओवरील जॅकी श्रॉफ यांची कमेंट चर्चेत; म्हणाले..

आई जया सावंत यांच्या निधनानंतर राखी टाहो फोडत रडताना दिसली. तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. बॉलिवूडमधल्या काही सेलिब्रिटींनीही राखीच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Rakhi Sawant | आईच्या निधनानंतर राखी सावंतच्या व्हिडीओवरील जॅकी श्रॉफ यांची कमेंट चर्चेत; म्हणाले..
Rakhi Sawant | आईच्या निधनानंतर राखी सावंतच्या व्हिडीओवरील जॅकी श्रॉफ यांची कमेंट चर्चेतImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 29, 2023 | 2:01 PM

मुंबई: अभिनेत्री राखी सावंतची आई जया सावंत यांची ब्रेन ट्युमर आणि कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनाने राखीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आई जया सावंत यांच्या निधनानंतर राखी टाहो फोडत रडताना दिसली. तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. बॉलिवूडमधल्या काही सेलिब्रिटींनीही राखीच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

राखीने सोशल मीडियावर आईच्या अखेरच्या क्षणांचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती हमसून हमसून रडताना दिसत आहे. जया यांची प्रकृती गंभीर असल्याचंही त्याच पहायला मिळतंय. ‘आज माझ्या डोक्यावरून आईचा हात कायमचा गेला. माझ्याकडे आता गमावण्यासारखं काहीच उरलेलं नाही. आई तुला खूप सारं प्रेम, तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काहीच शिल्लक नाही राहिलं. आता माझं कोण ऐकणार आणि कोण मला मिठी मारणार, मी कुठे जाऊ आई..’, अशा शब्दांत राखीने तिचं दु:ख व्यक्त केलं.

हे सुद्धा वाचा

या व्हिडीओवर सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट करत राखीसाठी संदेश लिहिला आहे. त्यापैकी अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ‘मी तुझं दु:ख समजू शकतो. मीसुद्धा माझ्या आईवडिलांना आणि भावाला गमावलं आहे. त्यांचा आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत राहील’, अशा शब्दांत त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या.

अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने लिहिलं, ‘या दु:खद क्षणी देव तुला हिंमत आणि ताकद देवो. आईच्या निधनाचं दु:ख सहन करण्याची ताकद तुला मिळो. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो’

राखी सावंतची आई गेल्या तीन वर्षांपासून आजारी होती. बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडल्यावर राखी थेट तिच्या आईला भेटायला रुग्णालयात गेली होती. त्यावेळी त्यांना ब्रेन ट्युमर झाल्याचं तिला समजलं. आधीच त्यांच्यावर कॅन्सरवरील उपचार सुरू होते. अभिनेता सलमान खानने राखीच्या आईच्या उपचारासाठी मदत केली होती.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.