AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jacqueline Fernandez : ‘नवा सुकेश पटवलाय वाटतं…?’ अभिनेत्रीच्या नव्या गाडीचं आणि तुरुंगातील आरोपीचं कनेक्शन?

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिस पुन्हा रॉयल आयुष्यामुळे चर्चेत, अभिनेत्री नवी चकाकती कार पाहिल्यानंतर 'पैसे कोणी पुरवले?..' यांसारख्या चर्चांना उधाण... अभिनेत्रीला महागड्या गाड्यांचा शोक, एक नाही तर जॅकलीन हिच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या...

Jacqueline Fernandez : 'नवा सुकेश पटवलाय वाटतं...?'  अभिनेत्रीच्या नव्या गाडीचं आणि तुरुंगातील आरोपीचं कनेक्शन?
| Updated on: Oct 21, 2023 | 10:50 AM
Share

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) कायम कोणच्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या सिनेमा किंवा खासगी आयुष्यामुळे नाही तर, रॉयल लाईफ स्टाईलमुळे चर्चेत आली आहे. नुकताच जॅकलिन हिला नव्या चकचकीत कारसोबत स्पॉट करण्यात आलं. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या कारची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री महागड्या कारमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसली. अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्री तिच्या BMW i7 कारमध्ये बसलेली दिसत आहे. अभिनेत्रीची कार इलेक्ट्रीक कार असून तिची किंमत जवळपास २ कोटी रुपये आहे.

जॅकलिन हिला महगड्या गाड्यांचा शोक आहे. अभिनेत्रीकडे BMW i7 शिवाय ‘Hummer H2’, ‘Mercedes-Benz Maybach S 500’, ‘Range Rover Vogue’, ‘BMW 525d’ आणि Jeep Compass यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्रीला नव्या गाडीसाठी पेसा कोणी पुरवले यांसारख्या चर्चा रंगत आहेत.

एक नेटकरी व्हिडीओ कमेंट करत म्हणाला, ‘सुकेश याचे पैसे आहेत दीदीकडे..’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘नवा सुकेश पटवला वाटतं.’, अन्य नेटकरी म्हणाला, ‘सुकेश याने पैसे पाठवले असतील..’ सध्या सर्वत्र फक्त जॅकलिन आणि अभिनेत्रीच्या नव्या कारची चर्चा रंगली आहे. यावर अद्याप अभिनेत्रीने कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.

सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीन फर्नांडिस यांचं नातं

गेल्या काही दिवसांपासून जॅकलिन तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत अभिनेत्रीचं नाव जोडण्यात आलं होतं. ज्यामुळे अभिनेत्री अनेक कठिण परिस्थितीचा सामना देखील करावा लागला. एवढंच नाही तर, अभिनेत्रीला कोर्टाच्या पायऱ्या देखील चढाव्या लागल्या होत्या. ज्याचा परिणाम अभिनेत्रच्या किरयरवर झाला होता.

सांगायचं झालं तर, सुकेश चंद्रशेखर प्रकरणादरम्यान जॅकलिनची अनेकवेळा चौकशी करण्यात आली आहे. दोघांचे खासगी फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सुकेशही जॅकलीनला महागड्या भेटवस्तू द्यायचा. इतकंच नाही तर तुरुंगात गेल्यानंतरही आरोपी सुकेश अभिनेत्रीला प्रेमपत्र लिहित असतो. सुकेश याच्यामुळे अभिनेत्री कायम चर्चेत असते.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.