Jailer फेम अभिनेत्याचं निधन; मृत्यूचं कारण समोर येताच सर्वत्र खळबळ
Jailer | 'जेलर' सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालं आहे, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अभिनेत्याच्या निधनाचं कारण कळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर

मुंबई : 8 सप्टेंबर 2023 | झगमगत्या विश्वातून एक वाईट बातमी समोर येत आहे. ‘जेलर’ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अभिनेत्याच्या निधनाचं कारण कळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे अभिनेत्याचं निधन झालं आहे. ‘जेलर’ सिनेमातील ज्या अभिनेत्याचं निधन झालं आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता आणि दिग्दर्शक जी मारीमुथू आहे. जी मारीमुथू याने वयाच्या ५८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मारीमुथू याच्या निधनाची चर्चा सुरु आहे. एवढंच नाही तर, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आणि सेलिब्रिटी मारीमुथू याला श्रद्धांजली वाहत आहेत.
मारीमुथू याने अभिनेते रजनीकांत स्टारर ‘जेलर’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अशात अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतल्यामुळे सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. मारिमुथू तामिळ सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेते असल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
SHOCKING : Popular Tamil Character Actor #Marimuthu passed away this morning due to cardiac arrest..
Recently, he developed a huge fan following for his TV Serial dialogues..
May his soul RIP! pic.twitter.com/fbHlhSesIy
— Ramesh Bala (@rameshlaus) September 8, 2023
मारीमुथू याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तमिळ टेलिव्हिजन मालिकेतील एथिर्नीचलच्या भूमिकेतून मारिमुथू याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मारिमुथू यांनी मणिरत्नम आणि इतरांसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं. पण त्यांच्या अशा अचानक निधनामुळे कुटुंबासह मित्र-परिवाराला देखील मोठा धक्का बसला आहे
फिल्म ट्रेड विश्लेषक रमेश बाला यांनी ‘जेलर’ फेम अभिनेता मारिमुथू याच्या निधनाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. रमेश बाला म्हणाले, ‘धक्कादायक… प्रसिद्ध तामिळ अभिनेता मारिमुथू याचं आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. नुकताच मारिमुथू याने मालिकेतील डायलॉगच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ते ५७ वर्षांचे होते.’ सध्या रमेश बाला यांचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायर होत आहे.
अभिनेते रजनीकांत स्टारर ‘जेलर’ सिनेमा
अभिनेते रजनीकांत स्टारर ‘जेलर’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. सिनेमातील काही सीन आणि गाणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.