‘सेलिब्रिटी फक्त पैशांसाठी…’, सूरत येथील शाही विवाह सोहळ्यात जान्हवी, अनन्या यांचा डान्स, व्हिडीओ व्हायरल

Janhvi Kapoor - Ananya Panday : सूरत येथील शाही विवाह सोहळ्यात जान्हवी, अनन्या यांचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल, लोकं म्हणाले, 'क्या जमाना आ गया है!', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रींच्या डान्सची चर्चा...

'सेलिब्रिटी फक्त पैशांसाठी...', सूरत येथील शाही विवाह सोहळ्यात जान्हवी, अनन्या यांचा डान्स, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Feb 13, 2024 | 8:15 AM

मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : झगमगत्या विश्वातील तारे फक्त सिनेमांमध्ये, अवॉर्ड फंक्शन फक्त यांसारख्या कार्यक्रमांमध्ये नाही तर, अनेकदा श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या लग्नात देखील डान्स करताना दिसतात. नुकताच अभिनेत्री अनन्या पांडे, जान्हवी कपूर, दिया मिर्झा यांना देखील एका शाही विवाह सोहळ्यात डान्स करण्यासाठी पोहोचल्या होत्या. अभिनेत्री विवाह सोहळ्यात फक्त उपस्थित राहण्यासाठी नाही तर, डान्स करण्यासाठी देखील पोहोचल्या होत्या. सध्या दोघींचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रिपोर्टनुसार, जान्हवी आणि अनन्या सूरत याठिकाणी इन्फ्लूएन्सर रूपल शाह याच्या लेकीच्या लग्नासाठी पोहोचल्या होत्या. या शाही लग्नाची झलक सूरतस्थित इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. या रीलमध्ये लिहिले आहे की, ही कोणत्याही अवॉर्ड फंक्शनची झलक नसून सुरतमध्ये आयोजित एका भव्य लग्नाचा सीन आहे. व्हिडीओमध्ये जान्हवी आणि अनन्या डान्स करताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये फक्त जान्हवी, अनन्या नाही तर, अभिनेत्री दिया मिर्झा देखील कार्यक्रम होस्ट करताना दिसत आहेत. जान्हवी कपूर आलिशान डोलीत बसून एंट्री करते. जान्हवी लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांकडे हात फिरवताना दिसत आहे. याशिवाय अनन्या पांडे बॅकग्राऊंड डान्सर्ससोबत परफॉर्म करताना दिसत आहे.

एवढंच नाही तर, व्हिडीओमध्ये अमित त्रिवेदी देखील गाताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते देखील हैराण झाले आहे. नक्की लग्न कोणाचं होतं? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘या रिलवर ईडीची नजर असेल…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘हे सूरत आहे, येथे अभिनेत्रींना फक्त नाचण्यासाठी बोलावतात.’, तर अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘सेलिब्रिटी फक्त पैशांसाठी डान्स करतात.’  सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी, अनन्या, दिया यांची चर्चा रंगलेली आहे.

सांगायचं झालं तर, अनेक सेलिब्रिटी लग्नाचं आमंत्रण आल्यानंतर एखाद्याच्या लग्नासाठी येतात. ज्यासाठी सेलिब्रिटी मोठी रक्कम घेतात. अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, हृतिक रोशन, कतरीना कैफ देखील कोणाच्य  लग्नासाठी जायचं असेल तर, मोठी रक्कम आकारतात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.