‘झलक दिखला जा’च्या सेटवर जान्हवी कपूरचा बेली डान्स; माधुरी दीक्षितही झाली तिची फॅन

जान्हवीच्या बेली डान्ससमोर नोरा पडली फिकी; 'झलक दिखला जा'च्या सेटवर अभिनेत्रीची धमाल

'झलक दिखला जा'च्या सेटवर जान्हवी कपूरचा बेली डान्स; माधुरी दीक्षितही झाली तिची फॅन
janhvi kapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 02, 2022 | 6:35 PM

मुंबई- अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या ‘मिली’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी ती नुकतीच ‘झलक दिखला जा 10’ या डान्स शोमध्ये पोहोचली. या शोमध्ये जान्हवीनेही तिच्या जबरदस्त डान्सची एक झलक दाखवली. तिचा डान्स पाहून परीक्षकपदी असलेली माधुरी दीक्षितसुद्धा थक्क झाली होती. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

जान्हवीने शास्त्रीय नृत्यासोबतच बेली डान्सचंही प्रशिक्षण घेतलं आहे. इन्स्टाग्रामवर याआधीही तिने स्वत:च्या डान्सचे व्हिडीओ पोस्ट केले होते. आता ‘झलक दिखला जा’ या शोच्या मंचावर तिने पुन्हा एकदा बेली डान्स केला. लॉकडाऊनदरम्यान जान्हवीने बेली डान्सचं प्रशिक्षण घेतलं होतं. हा व्हिडीओ पाहून आता तिला हा डान्स उत्तर जमत असल्याचं स्पष्ट दिसतंय.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

माधुरी दीक्षित, नोरा फतेही आणि निर्माता-दिग्दर्शक करण जोहर हे या शोचे परीक्षक आहेत. यापैकी माधुरीनेच जान्हवीकडे बेली डान्स करण्याची विनंती केली. जान्हवीला माधुरीची ही विनंती पूर्ण करावीच लागली. तिच्या डान्सचा व्हिडीओ कलर्स टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

मिली या चित्रपटात जान्हवीसोबत मनोज पाहवा आणि सनी कौशल यांनी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि बोनी कपूर यांनी केली आहे. येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.