Janhvi Kapoor | अडल्ट पेजवर जान्हवीने पाहिला स्वत:चा मॉर्फ्ड फोटो; सांगितली धक्कादायक घटना

अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वत:विषयी धक्कादायक खुलासा केला. जान्हवीने सांगितलं की, एका अडल्ट पेजवर तिने स्वत:चा मॉर्फ्ड केलेला फोटो पाहिला तेव्हा तिला धक्काच बसला. हे सांगतानाच तिने सध्याच्या AI तंत्रज्ञानाविषयी चिंता व्यक्त केली.

Janhvi Kapoor | अडल्ट पेजवर जान्हवीने पाहिला स्वत:चा मॉर्फ्ड फोटो; सांगितली धक्कादायक घटना
Janhvi KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 1:07 PM

मुंबई | 29 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी जान्हवीने ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र चित्रपटांपेक्षा ती तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा प्रकाशझोतात आली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने सांगितलं की, जेव्हा ती फक्त दहा वर्षांची होती, तेव्हा पापाराझींनी पहिल्यांदा तिचा फोटो क्लिक केला. तो फोटो जेव्हा तिने ‘याहू’ या वेबसाइटच्या होम पेजवर पाहिला. तेव्हा ती थक्क झाली होती. कारण त्याकाळी ‘याहू’ ही सर्वात लोकप्रिय वेबसाइट्सपैकी एक होती.

या मुलाखतीत जान्हवी तिच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. जान्हवी आता तिच्या फॅशन आणि बोल्ड कपड्यांमुळे ओळखली जात असली तरी, एकेकाळी तिला सजून धजून तयार व्हायला अजिबात आवडायचं नाही. या कारणामुळे मित्र-मैत्रिणीसुद्धा तिच्यापासून लांबच राहायच्या असं तिने सांगितलं. याविषयी जान्हवी म्हणाली, “त्यांनी मला समजून घेतलं नाही आणि म्हणूनच ते मला नापसंत करू लागले. माझ्यासोबत नेमकं काय घडतयं हे मला कळत नव्हतं. माझे मित्र मला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायचे. मी वॅक्सिंग करत नाही म्हणून ते माझी खिल्ली उडवायचे.”

हे सुद्धा वाचा

याच मुलाखतीत जान्हवीने तिच्या किशोरवयातील एक धक्कादायक आठवणी सांगितली. जान्हवीचा फोटो मॉर्फ करून ‘याहू’च्या एका अडल्ट पेजवर पोस्ट करण्यात आला होता. अडल्ट पेजवर आपला एडिट केलेला फोटो पाहून जान्हवीला त्यावेळी खूप मोठा धक्का बसला होता. आताच्या काळातही AI तंत्रज्ञानामुळे अशा गोष्टींना आणखी प्रोत्साहन मिळत असल्याचं जान्हवी म्हणाली. ही गोष्ट तितकीच चिंताजनक असल्याचं तिने सांगितलं. “मला फार कमी वयापासूनच लोकांच्या जजमेंटचा सामना करावा लागला होता. मी स्वतःच्या मर्जीने जेव्हा प्रकाशहोतात आली, तेव्हासुद्धा लोकांनी माझ्यावर बरेच प्रश्न उपस्थित केले होते,” असं जान्हवी पुढे म्हणाली.

जान्हवी तिच्या खासगी आयुष्यामुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडियाला ती डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.