सुशिलकुमार शिंदेंच्या मुलीसोबत जान्हवी कपूर पोहोचली सिद्धिविनायक मंदिरात

अभिनेत्री जान्हवी कपूर गुढीपाडव्यानिमित्त सिद्धिविनायक मंदिरात अनवाणी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळी तिच्यासोबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदेसुद्धा होत्या. स्मृती शिंदेंच्या मुलाला जान्हवी कपूर डेट करतेय.

सुशिलकुमार शिंदेंच्या मुलीसोबत जान्हवी कपूर पोहोचली सिद्धिविनायक मंदिरात
जान्हवी कपूर, स्मृती शिंदेImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 09, 2024 | 1:05 PM

निर्माते बोनी कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर नेहमी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच ती तिच्या वाढदिवसानिमित्त बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. त्यानंतर आता जान्हवी शिखरच्या आईसोबत मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचली आहे. शिखर पहाडिया हा स्मृती शिंदे यांचा मुलगा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू आहे. स्मृती शिंदे या सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. नुकतंच जान्हवीला स्मृती यांच्यासोबत सिद्धिविनायक मंदिरात गेल्याचं पहायला मिळालं. या दोघींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गुढीपाडवानिमित्त जान्हवी सकाळी अनवाणी सिद्धिविनायक मंदिरात गेली होती. यावेळी ती शिखरच्या आईचा हात पकडून चालत होती. जान्हवीचे वडील बोनी कपूर यांच्या निर्मितीचा ‘मैदान’ हा चित्रपट येत्या 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे वडिलांच्या चित्रपटाला यश मिळण्यासाठी आणि नववर्षानिमित्त बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी जान्हवीने सिद्धिविनायक मंदिरात हजेरी लावली. यावेळी तिने गुलाबी रंगाचा पंजाबी सूट परिधान केला होता.

हे सुद्धा वाचा

जान्हवीने तिच्या वाढदिवशी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. या मंदिराला भेट देण्याची ही तिची 50 वी वेळ होती. यावेळी शिखरसोबतच जान्हवीचा खास मित्र ओरहान अवत्रमणी ऊर्फ ऑरीसुद्धा होता. त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये या व्हिडीओमध्ये जान्हवी तिच्या गुडघ्यांवर बसून तिरुपती बालाजी मंदिरात जाण्यासाठीच्या पायऱ्या चढताना दिसली होती. तिरुपती बालाजीचं मंदिर हे जान्हवीच्या खास जवळचं आहे, कारण तिची आईसुद्धा अनेकदा त्याठिकाणी जायची.

जान्हवी कपूर गेल्या काही काळापासून शिखर पहाडियाला डेट करतेय. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. ‘कॉफी विथ करण 8’मध्ये जान्हवीने अप्रत्यक्षरित्या तिच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब केला होता. शिखर पहाडिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. वीर आणि शिखर हे भाऊ-भाऊ आहेत. जान्हवी आणि शिखर यांचं एकाच शाळेत शिक्षण झालं आहे. त्यामुळे शाळेपासूनच दोघं एकमेकांना ओळखतात.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.