Janmashtami 2023 : गोविंदा आला रे… दमदार बॉलिवूड गाण्यांनी साजरा करा दहीहंडीचा जल्लोष
Janmashtami 2023 : बॉलिवूडच्या दमदार गाण्यांची वाढणार दहीहंडीचा जल्लोष; दहीहंडीच्या मुहूर्तावर ऐकूया बॉलिवूडची दमदार गाणी... सध्या सर्वत्र 'या' गाण्यांची चर्चा
मुंबई : 7 सप्टेंबर 2023 | होळी, दिवाळी, गणपती कोणताही सण बॉलिवूडच्या गाण्यांशिवाय पूर्ण होवू शकत नाही. आज सर्वत्र दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. तर आजच्या दहीहंडी उत्सव बॉलिवूडच्या दमदार गाण्यांनी आणखी खास करता येईल. बॉलिवूडमधील अनेक सिनेमांध्ये कृष्ण जन्माष्टमीची उत्कंठा पाहायला मिळावी. एवढंच नाही तर, जन्माष्टमीवर अनेक गाणी रचली देखील गेली आहेत. जी आजही लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडीच्या दिवशी बॉलिवूडच्या गाण्यांची क्रेझ पाहायला मिळते. तर आज दहीहंडीच्या मुहूर्तावर ऐकूया बॉलिवूडची दमदार गाणी…
मैया यशोदा…- सलमान खान स्टारर ‘हम साथ साथ है’ सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सिनेमातील गाणी आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. सिनेमातील ‘मैया यशोदा’ जन्माष्टमीवर आधारित आहे. गाणं आजही चाहत्यांच्या आवडीचं आहे.
गोविंदा आला रे आला..- ‘ब्लफ मास्टर’ सिनेमातील हे गाणं जन्माष्टमी आणि दहीहंडीसाठी प्रसिद्ध आहे. गाण्यात प्रत्येक जण मोठ्या उत्साहाने दहीहंडीचा सण साजरा केला आहे.
मच गया शोर सारी नगरी में..- अमिताभ बच्चन स्टारर ‘खुद्दार’ सिनेमातील हे गाणं खास दहीहंडीसाठी रचण्यात आलं आहे. गाण्यात महानायक अमिताभ बच्चन मटकी फोडताना दिसत आहे. तुम्ही देखील या गाण्यासह तुमचा दहीहंडीचा सण उत्साहात साजरा करा.
चांदी की डाल पर सोने का मोर..- अभिनेता सलमान खान याचं गाणं आजही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. दहीहंडीच्या दिवशी भाईजानच्या गाण्याची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसून येतो. सिनेमात सलमान खान याच्यासोबत अभिनेत्री राणी मुखर्जी दिसली होती.
गो गो गोविंदा….- ‘ओह माय गोड’ सिनेमातील हे गाणं प्रचंड लोकप्रिय आहे. गाण्यातील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि कोरियोग्राफर प्रभू देवा दमदार डान्सने चाहत्यांना वेड लावलं. गाण्यात सोनाक्षी हंडी फोडताना दिसली.
वो किसना है – कृष्ण जन्माष्टमीच्या प्रत्येक कार्यक्रमात हे गाणे तुम्हाला कायम ऐकायला मिळेल. विवेक ओबेरॉय आणि ईशा शर्वानी यांच्या सिनेमातील गाणं आजही प्रसिद्ध आहे. अनेकांच्या सोशल मीडिया स्टोरीवर देखील ‘वो किसना है’ गाणं ऐकायला मिळत आहे.