मुस्लिमांना 4 बायका ठेवण्याचा हक्क, हिंदू मात्र…, जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य

Javed Akhtar | जावेद अख्त कायम त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता देखील त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांचे हक्क आणि अधिकारांवर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जावेद अख्तर यांची चर्चा रंगली आहे. तर जावेद अख्तर यांनी असं वक्तव्य का केलं जाणून घेऊ.

मुस्लिमांना 4 बायका ठेवण्याचा हक्क, हिंदू मात्र..., जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 8:39 AM

मुंबई | 19 मार्च 2024 : बॉलिवूडचे दिग्गज गीतकार आणि लेखक जावेद अख्तर कायम त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता देखील त्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. जावेद अख्तर म्हणाले समान नागरी कायद्याला (Uniform Civil Code) माझा पाठिंबा आहे. शिवाय खऱ्या आयुष्यात कायद्याचं पालन देखील करतो.. असं वक्तव्य जावेद अख्तर यांनी केलं. पण मुस्लिमांचा द्वेष करणाऱ्या लोकांचा पाठिंबा UCC ला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी समाजात सुरु असणाऱ्या आणि स्वतःला खटकणाऱ्या गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जावेद अख्तर यांची चर्चा रंगली आहे.

Uniform Civil Code वर स्वतःचं मत मांडत जावेद अख्तर म्हणाले, ‘फक्त मुस्लिमांवर टीका करण्यासाठी काही नियम लागू करणं योग्य नाही. चर्चा करुन काही नियम समान रुपाने सर्वांसाठी लागू करण्यात यायला हवेत. मी स्वतःसमान नागरी कायद्याचं पालन करतो. पण मुस्लिमांना बहुविवाह करता येऊ नये म्हणून समान नागरी कायद्याला पाठिंबा देत असेल तर हे चुकीचं आहे…’ असं देखील जावेद अख्तर म्हणाले.

पुढे जावेद अख्तर विनोदी अंदाजात म्हणाले, ‘मुस्लिमांना चार बायका ठेवण्याचा अधिकार आहे म्हणून इतर लोकं जळतात. कायदा लागू करण्यासाठी हेच एक कारण आहे का? जर तुम्हाला देखील हा हक्क दिला गेल्यास काही अडचणी येणार नाहीत…’ हिंदू व्यक्ती आणि त्यांच्या लग्नांवर देखील जावेद अख्तर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

हे सुद्धा वाचा

‘बेकायदेशीर रित्या हिंदू देखील बहुविवाह करत आहेत. हिंदूंमध्ये दोन लग्न अधिक आहे… सांगितलं जातं. प्रत्येकासाठी कायदा सारखा असायला हवा. मी माझ्या मुलाला आणि मुलीला समान अधिकार दिले आहेत.’ असं देखील जावेद अख्तर म्हणाले. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जावेद अख्तर यांची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, जावेद अख्तर कायम त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. काही बेधडक वक्तव्यांमुळे त्यांनी वादग्रस्त परिस्थितीचा देखील समना करावा लागला आहे. एवढंच नाहीतर, जावेद अख्तर त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.