फाटलेले कपडे, तीन दिवस मिळाला नाही अन्नाचा कणही, जावेद अख्तर म्हणाले, माझी लायकी…

जावेद अख्तर यांनी अत्यंत मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला आहे. जावेद अख्तर यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत मोठा संघर्ष केलाय. हेच नाही तर जावेद अख्तर यांच्याकडे एक वेळेची खाण्यासाठीही पैसे नव्हते. मुंबईमध्ये आल्यावर आपल्यासोबत काय काय घडले हे सांगताना जावेद अख्तर हे दिसले.

फाटलेले कपडे, तीन दिवस मिळाला नाही अन्नाचा कणही, जावेद अख्तर म्हणाले, माझी लायकी...
Javed Akhtar
Follow us
| Updated on: Aug 20, 2024 | 2:33 PM

जावेद अख्तर यांनी त्यांच्या आयुष्यात खूप मोठा संघर्ष केलाय. हेच नाही तर ज्यावेळी ते मुंबईमध्ये आले, त्यावेळी त्यांच्याकडे ना जेवणासाठी पैसे होते ना राहण्यासाठी घर होते. रेल्वे स्टेशन, फुटपाथ, पार्कमध्ये झोपून त्यांनी मुंबईमध्ये दिसल काढले. हेच नाही तर तीन दिवस त्यांना एक अन्नाचा घासही खाण्यास मिळाला नाही. सलीम-़ जावेद यांची डॉक्यूमेंटी ‘द एंग्री यंगमॅन’ प्रदर्शित झालीये. यामध्ये प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी आपल्या संघर्षाचे दिवस कसे होते हे सांगितले आहे. मुंबईत आल्यावर फक्त खाणे आणि राहण्याचाच नाही तर कपड्यांसाठीची त्यांना मोठा संघर्ष करावा लागला.

जावेद अख्तर हे आपल्या संघर्षाच्या दिवसांवर बोलत असताना रडताना दिसले. जावेद अख्तर म्हणाले, भोपाळमध्ये पदवी घेऊन मी मुंबईमध्ये आलो. गुरू दत्त आणि राज कपूर यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न घेऊन मी मुंबई आलो. मुंबईमध्ये एकटा होतो. कधी मित्रांसोबत तर कधी, स्टेशन, पार्क आणि रस्त्यांवर झोपून दिवस काढले. एक वेळ अशी होती की, घालण्यासाठी कपडे देखील नव्हते.

त्यावेळी माझ्याकडे असलेले ट्राउजर इतके फाटले होते की, मी त्याला शेवटचे घातले तर परत घालू शकणार नव्हतो. माझ्याजवळ दुसरे कोणतेही ट्राउजर देखील नव्हते, ते एकच होते. जावेद अख्तर यांनी वयाच्या 15 व्या वर्षी काकूचे घर सोडले. त्यांना कधीच त्यांच्या कुटुंबाकडून कोणतीही मदत घ्यायची नव्हती. जे काही करायचे होते ते स्वत: करायचे होते.  

शबानाने सांगितले की, जावेद अख्तर यांच्या आयुष्यात एकवेळी अशीही आली की, त्यांनी तब्बल दोन दिवस जेवणच केले नाही. जावेद अख्तर भावूक होत म्हणाले की, ज्यावेळी आयुष्यात तुम्हाला जेवणासाठी, राहण्यासाठी मिळत नाही, त्यावेळी त्याचा एक वेगळाच प्रभाव हा आयुष्यावर होतो. ज्याला तुम्ही कधीच विसरू शकत नाहीत.

जावेद अख्तर यांनी म्हटले की, आजही मी ज्यावेळी मोठ्या लग्झरी हॉटेलमध्ये जातो. त्यावेळी मला जुने दिवस आठवतात. मला ज्यावेळी ब्रेकफास्ट मिळतो, त्यामध्ये बटर, जॅम, हाफ फ्राई एग्स आणि कॉपी असते. हे सर्व पाहून मी विचार करतो की, तुझी ही लायकी होती? खरोखरच याचा मी हक्कदार आहे? मला वाटते की, असे हे ब्रेकफास्ट माझ्यासाठी नाहीत.

Non Stop LIVE Update
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.