Kangana Ranaut | कंगनाला घरी बोलावल्यानंतर ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं? जावेद अख्तर यांचा कोर्टात खुलासा

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर 2020 मध्ये कंगनाने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत इतर विषयांवर मतं मांडत असतानाच कंगनाने जावेद अख्तर यांचा उल्लेख केला होता. अख्तर यांनी मला हृतिक रोशनची माफी मागण्याचा सल्ला दिला होता, असं कंगना म्हणाली होती.

Kangana Ranaut | कंगनाला घरी बोलावल्यानंतर 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? जावेद अख्तर यांचा कोर्टात खुलासा
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 1:31 PM

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतला घरी भेटल्याच्या ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं होतं, याचा खुलासा गीतकार जावेद अख्तर यांनी अखेर कोर्टात केला आहे. आपल्याला कशासाठी बोलावण्यात आलंय हे कंगनाला माहीत होतं आणि म्हणूनच ती तिच्या बहिणीसोबत आली होती, असं ते म्हणाले. 2016 मध्ये जावेद अख्तर यांनी कंगनाला त्यांच्या घरी बोलावलं होतं. अभिनेता हृतिक रोशनसोबत सुरू असलेल्या वादावर तिला काही सल्ले देण्यासाठी त्यांनी घरी आमंत्रित केलं होतं. नंतर 2020 मध्ये कंगनाने एका टेलिव्हिजन मुलाखतीत असा खुलासा केला की, तिला धमकी देण्यात आली होती. या आरोपांमुळेच जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात मानहानीचा खटला दाखल केला.

जावेद अख्तर कोर्टात काय म्हणाले?

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, जावेद अख्तर यांनी मंगळवारी अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात सांगितलं की त्यावेळी ते कंगनाला ओळखत नव्हते. त्यांचे कॉमन मित्र डॉ. रमेश अग्रवाल यांना कंगनाला हृतिकसोबतच्या वादावर नेमकं काय करायचं याबद्दल सल्ला द्यायचा होता.

अख्तर म्हणाले, “हे खरंय की मी कंगनाला ओळखत नव्हतो आणि हृतिकसोबतच्या तिच्या वादाशी माझं काहीच घेणंदेणं नव्हतं. पण डॉ. अग्रवाल यांनी कंगनाला बोलावलं होतं आणि त्यांचं तिच्याशी जवळचं नातं होतं. ते तिला कॉल करून भेटण्याविषयी आग्रह करू शकत होते. हेसुद्धा तितकंच खरं आहे की कंगनाला माझं ऐकायचं नव्हतं आणि ती बहीण रंगोलीसोबत तिथून निघून गेली. मात्र यात काहीच सत्य नाही की ती माझ्या वक्तव्यावर नाराज होती. कारण ती स्वत:हून नम्रपणे भेटायला आली होती.”

हे सुद्धा वाचा

अख्तर यांच्या घरी का बोलावलं याची कंगनाला होती कल्पना

कोर्टात जावेद यांना विचारण्यात आलं होतं की कंगना आणि तिची बहीण रंगोली हे तुमच्या घरी आज्ञाधारकपणे आल्या होत्या का? त्यावर अख्तर यांनी उत्तर देताना म्हटलं, “तुम्ही कंगनाकडून आज्ञाधारकपणाची अपेक्षा करता, याला आज्ञापालन म्हणत नाही. पण एखाद्या गोष्टीवर उपायासाठी नक्कीच आल्या होत्या. त्या दोघी माझ्या घरी आल्या होत्या हे भौतिक वास्तव आहे. परंतु आज्ञाधारकपणा ही केवळ मनातली कल्पना आहे.”

“मी तिला कॉलवर भेटण्यामागचा उद्देश सांगितला होता. मी तिला हवामान, राजकीय परिस्थिती किंवा 2016 मधील अमेरिकेच्या निवडणुकांबद्दल गप्पा मारायला बोलावलं नव्हतं. मी कंगनाला वैयक्तिकरित्या ओळखत नसलो तरी एक कलाकार म्हणून मला तिचं काम नेहमीच आवडलं होतं. पण ती माझा सल्ला ऐकणार नाही हे जेव्हा मला समजलं तेव्हा मी विषय बदलला होता”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

मुलाखतीत कंगना नेमकं काय म्हणाली होती?

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर 2020 मध्ये कंगनाने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत इतर विषयांवर मतं मांडत असतानाच कंगनाने जावेद अख्तर यांचा उल्लेख केला होता. अख्तर यांनी मला हृतिक रोशनची माफी मागण्याचा सल्ला दिला होता, असं कंगना म्हणाली होती. 2016 मध्ये हृतिकने कंगनाविरोधात खटला दाखल केला होता. “एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावलं होतं. ते मला म्हणाले की राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंबीय हे खूप मोठे व्यक्ती आहेत. जर तू त्यांची माफी मागितली नाहीस तर ते तुला तुरुंगात डांबणार. या सर्व त्रासानंतर तुझ्यासमोर एकच पर्याय शिल्लक राहील आणि ते म्हणजे आत्महत्या. हे त्यांचे शब्द होते. ते माझ्यावर ओरडले. मी त्यांच्या घरी थरथर कापत होती”, असं कंगना मुलाखतीत म्हणाली होती.

कंगनाने त्या मुलाखतीत जे काही सांगितलं, ते सर्व खोटं होतं असा आरोप जावेद यांनी केला. त्यानंतर त्यांनी कंगनाविरोधात मानहानीचा खटला दाखल केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.