‘फ्रेंड्स विथ बेनिफिट’ वर आहे विश्वास? जया बच्चन यांनी नात नव्याला दिला रिलेशनशिपबद्दल सल्ला
Jaya Bachchan | 'लग्नानंतर प्रेम एक दिवस संपत म्हणून..', जया बच्चन यांनी नात नव्या नवेली हिला दिला रिलेशनशिपबद्दल सल्ला... जया बच्चन यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंज केलं. आजही जया बच्चन कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात...
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि बच्चन कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. आता देखील बिग बी यांची नात नव्या नवेली नंदा हिच्यामुळे बच्चन कुटुंबाच्या चर्चा रंगत आहेत. नव्या नवेली हिचं आजी आणि अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत नातं घट्ट आहे. जया बच्चन, नव्या हिच्या फक्त आजी नाहीतर, मैत्रीण देखील आहे. जया बच्चन नात नव्या हिला कायम महत्त्वाचे सल्ले देखील देत असतात. नुकताच, ‘व्हाट द हेल नव्या’ या नव्याच्या पॉडकास्ट शोमध्ये जया बच्चन यांनी रिलेशनशिपबद्दल सल्ला दिला.
रिलेशनशिपबद्दल सल्ला देत जया बच्चन म्हणाल्या, ‘गोष्ट माझ्या पिढीतील असो किंवा श्वेता हिच्या पिढीतील आम्ही या विषयावर विचार देखील करु शकत नव्हतो…, पण नव्याच्या वयातली मुलं जेव्हा या अनुभवातून जातात तेव्हा कुठेतरी त्यांना आपण स्वतः अपराधी आहोत असं वाटतं… हे पाहून मला प्रचंड वाईट वाटतं…’
View this post on Instagram
पुढे जया बच्चन म्हणाल्या, ‘मला असं वाटतं आजच्या मुलांमध्ये फिलिंग्स आणि रोमान्सची फार कमी आहे. त्यामुळे मला असं वाटतं आजच्या मुलांनी त्यांच्या खास मित्रासोबतच लग्न केलं पाहिजे. एकमेकांना समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे.. लग्नानंतर प्रेम एक दिवस खिडकीतून बाहेर निघून जातो…’ असं देखील जया बच्चन म्हणाल्या.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जया बच्चन यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. नव्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, नव्या फक्त अमिताभ बच्चन यांची नात म्हणून लोकप्रिय नाहीतर, ‘व्हाट द हेल नव्या’ या तिच्या पॉडकास्ट शोमुळे देखील नव्या चर्चेत असते. शोच्या पहिल्या सिझनमध्ये नव्या हिने आजी जया बच्चन आणि आई श्वेता बच्चन – नंदा यांच्यासोबत अनेक विषयांवर गप्पा मारल्या…
नव्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत नव्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नव्या हिच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री देखील फिक्या आहेत. सोशल मीडियावर नव्या हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सर्वत्र फक्चा आणि फक्त नव्या हिची चर्चा रंगली आहे.