जया बच्चन यांची हुबेहूब नक्कल; हा Video पाहून पोट धरून हसाल!

तरुणीने केली जया बच्चन यांनी जबरदस्त मिमिक्री; तुम्हालाही हसू होईल अनावर!

जया बच्चन यांची हुबेहूब नक्कल; हा Video पाहून पोट धरून हसाल!
जया बच्चन यांच्या मिमिक्रीचा व्हिडीओImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 12:41 PM

मुंबई: ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांना नेहमीच पापाराझींसमोर चिडताना आणि रागावताना पाहिलं गेलंय. जया बच्चन यांना फोटो किंवा सेल्फी क्लिक करणं अजिबात आवडत नाही. अशा वेळी कॅमेरासमोर त्यांचा राग सहज पहायला मिळतो. यामुळे अनेकदा त्या ट्रोलिंगच्याही (Trolling) शिकार होतात. सध्या त्यांच्याच मिमिक्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका मुलीने हुबेहूब जया बच्चन यांची मिमिक्री (Mimicry) केली आहे. या मुलीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

डिजिटल क्रिएटर एनाली सेरेजोने हा क्लिप पोस्ट केला आहे. जया बच्चन पापाराझींसोबत ज्या पद्धतीने बोलतात, त्यांच्या प्रतिक्रिया जशा असतात, त्याची नक्कल एनाली या व्हिडीओत करताना दिसतेय. एनालीने जया बच्चन यांची हुबेहूब नक्कल केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. त्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

हे सुद्धा वाचा

‘फक्त हसण्यासाठी’ असं कॅप्शन देऊन एनालीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 19 ऑक्टोबर रोजी शेअर झालेल्या या व्हिडीओला आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

‘अगदी कमाल मिमिक्री केलीस’ अशी कमेंट एका युजरने केली. तर ‘पोट धरून हसतोय’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘हा व्हिडीओ ओरिजिनलपेक्षाही खूप चांगला आहे’ अशा शब्दांतही नेटकऱ्यांनी कौतुक केलंय.

जया बच्चन नेहमीच त्यांच्या बेधडक स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्यांचा तापट स्वभाव ओळखून अनेकदा फोटोग्राफर आणि कॅमेरामनसुद्धा चार हात लांबच राहतात.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.