जया बच्चन यांच्या आईच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, रुग्णालयात होत्या दाखल

Jaya Bachchan Mother Indira Bhaduri : जया बच्चन यांच्या आईंना नक्की काय झालं होतं? त्यांच्या आईच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर... चाहत्यांकडून चिंता व्यक्त... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जया बच्चन यांच्या आईंच्या प्रकृतीची चर्चा...

जया बच्चन यांच्या आईच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, रुग्णालयात होत्या दाखल
Follow us
| Updated on: Dec 10, 2023 | 10:42 AM

मुंबई | 10 डिसेंबर 2023 : ज्येष्ठ अभिनेत्री आणि राजकारणी जया बच्चन यांच्या आईच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी जया बच्चन यांच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांच्यावर वयाच्या 93 व्या वर्षी पेसमेकर (pacemaker) सर्जरी पार पडणार होती. ही सर्जरी आता पार पडली असून इंदिरा भादुरी यांना रुग्णालयातून सुट्टी देखील मिळाली असल्याची माहिती मिळत आहे. हृदयाशी संबंधित समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांच्यावर मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते. आता इंदिरा भादुरी यांना घरी नेण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरा भादुरी यांना शनिवारी संध्याकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. इंदिरा भादुरी यांना घरी आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. इंदिरा भादुरी रुग्णालयात असताना जया बच्चन कायम आईला भेटण्यासाठी रुग्णालयात जायच्या… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांची चर्चा रंगत आहे.

जया बच्चन यांचे सिनेमे

जया बच्चन यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही जया बच्चन यांचे अनेक सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहातात. नुकताच, जया बच्चन ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आल्या होत्या. सिनेमाच्या चाहत्यांच्या मनात घर केलं आणि बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.

हे सुद्धा वाचा

‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमा जया बच्चन यांच्यासोबत अभिनेता रणवीर सिंह, अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेते धर्मेंद्र यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सिनेमातील गाणी देखील चाहत्यांना प्रचंड आवडली.

जया बच्चन यांच्या नातवाचा पहिला सिनेमा

जया बच्चन आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा नातून अगस्त्य नंदा स्टारर ‘द आर्चीज’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिकक्सवर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र दिसलं. बच्चन कुटुंबाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. सिनेमात बच्चन कुटुंबातील मुलासोबत अभिनेता शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक खुशी कपूर हिने देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.