जया किशोरी यांनी ‘बुगी वुगी’साठी दिलं होतं ऑडिशन; डान्सचा व्हिडीओ व्हायरल

प्रसिद्ध कथावाचक जया किशोरी यांनी 'बुगी वुगी' या डान्स शोमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी त्या 11 वर्षांच्या होत्या. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये त्या डान्सनंतर परीक्षकांसमोर गाणंही गाताना दिसून येत आहेत.

जया किशोरी यांनी 'बुगी वुगी'साठी दिलं होतं ऑडिशन; डान्सचा व्हिडीओ व्हायरल
Jaya KishoriImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 22, 2024 | 8:14 AM

मोटिवेशनल स्पीकर आणि कथावाचक जया किशोरी सोशल मीडियावर फार लोकप्रिय आहेत. विविध मुद्द्यांवरील त्यांचे विचार तरुणाईला आवडतात आणि त्यामुळेच त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. 28 वर्षीय जया किशोरी या कथावाचक असल्याचं तर अनेकांना माहित आहे. त्या उत्तर गायिकासुद्धा आहेत. मात्र फार क्वचित लोकांना ही गोष्ट माहित असेल की त्या डान्सरसुद्धा आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते ‘बुगी वुगी’ या प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये दमदार परफॉर्म करताना दिसत आहेत. लहान असताना त्यांनी या शोमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी त्या 11 वर्षांच्या होत्या.

एकेकाळी ‘बुगी वुगी’ हा रिॲलिटी शो तुफान लोकप्रिय होता. त्यावेळी 11 वर्षीय जया किशोरी यांनी शोसाठी ऑडिशन दिलं होतं. सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये त्या शास्त्रीय नृत्य करताना दिसत आहेत. मी कोलकाताहून असल्याचं त्या या व्हिडीओमध्ये सांगत आहेत. त्यांचं सर्वांत मोठं स्वप्न हे शो जिंकल्यानंतर मुंबईला जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन करणं आहे. जया किशोरी यांचा डान्स परफॉर्मन्स पाहिल्यानंतर परीक्षक जावेद जाफरी, नावेद जाफरी आणि रवी बहल खूप खुश होतात.

पहा व्हिडीओ-

हे सुद्धा वाचा

या शोमध्ये जावेद जाफरीशी बोलताना जया किशोरी सांगतात की त्यांचं नाव जया शर्मा आहे आणि त्या कोलकाताच्या आहेत. त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून शास्त्रीय नृत्य शिकण्यास सुरुवात केली होती. 11 वर्षीय जया किशोरी या व्हिडीओत सांगतात की गेल्या दोन वर्षांपासून त्या डान्स करत आहेत. डान्ससोबतच गायनसुद्धा करत असल्याचं त्यांनी परीक्षकांना सांगितलं. हे ऐकताच परीक्षक खुश होतात. ते जया यांना गाण्याची विनंतीसुद्धा करतात. त्यानंतर जया किशोरी या कृष्ण आणि राधा यांच्या होळीनिमित्त बनलेलं एक भजन गाऊन दाखवतात. त्यांचं गायनकौशल्य पाहून परीक्षक प्रभावित होतात.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत जया किशोरी यांनी सांगितलं होतं की नृत्य हे त्यांचं पहिलं प्रेम आहे. आजसुद्धा त्यांना डान्स खूप आवडत असल्याचं त्यांनी सांगितलं. “मला शाळेत असताना अभ्यासात फार रस नव्हता. माझी आई मला खूप मेहनतीने उठवायची. शनिवारी आणि रविवारी मी कथ्थक शिकायला जायचे. त्यावेळी मात्र मी पहाटे 3 वाजताच उठून बसायची”, असं त्या म्हणाल्या.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.