‘जोधा अकबर’ फेम जोधाचं हटके ट्रांसफॉर्मेशन, 10 वर्षांनंतरही दिसते प्रचंड सुंदर
Jodha Akbar fame Paridhi Sharma: 'जोधा अकबर' मालिकेत जोधा या भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री परिधी शर्माचं हटके ट्रांसफॉर्मेशन, 10 वर्षांनंतरही दिसते प्रचंड सुंदर, सोशल मीडियावर कायम असते सक्रिय... अभिनेत्रीचा फोटो पाहून व्हाल थक्क... फोटो एकदा पाहाच...
Jodha Akbar fame Paridhi Sharma: अभिनेत्री परिधी शर्मा आज अभिनय क्षेत्रात पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. परिधी हिने अनेक मालिकांमध्ये काम केलं पण ‘जोधा अकबर’ या मालिकेमुळे परिधी हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. परिधी शर्माने आपल्या करिअरची सुरुवात ‘तेरे मेरे सपने’मधून केली होती. जोधा अकबर मालिकेत अभिनेता रजत टोकससोबत काम करून अभिनेत्रीला नवीन ओळख मिळाली.
मालिकेतील परिधी – रजत यांची केमिस्ट्री देखील चाहत्यांनी प्रचंड आवडली. पण आता अभिनेत्री कोणत्या मालिकेमुळे नाहीतर, तिच्या हटके ट्रांसफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर परिधी कायम सक्रिय असते. अभिनेत्रीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
परिधी हिने ‘नो मेकअप’ लूक आणि काळ्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.फोटोमध्ये ‘नो मेकअप’लूकमध्ये देखील अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘निसर्गाच्या सानिध्यात…’असं लिहिलं आहे.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त परिधी शर्मा हिच्या फोटोची चर्चा रंगत आहे. 10 वर्षांनंतर अभिनेत्रीचं हटके ट्रांसफॉर्मेशन चाहत्यांना हैराण करत आहे. 10 वर्षांनंतर देखील परिधी प्रचंड सुंदर दिसते… अशी कमेंट चाहते अभिनेत्रीच्या पोस्टवर करत आहेत.
परिधी शर्मा हिच्या मालिकांबद्दल सांगायचं झालं तर, जोधा अकबर मालिकेत झळकण्यापूर्वी अभिनेत्रीने करियरच्या सुरुवातील खलनायकाच्या भूमिका देखील साकारल्या होत्या. पहिल्यांदा अभिनेत्री 2010 मध्ये ‘तेरे मेरे सपने’ मध्ये दिसली होती. त्यानंतर अभिनेत्री ‘रुक जाना नही’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.
View this post on Instagram
दोन मालिकांमध्ये कायम केल्यानंतर देखील परिधी प्रसिद्धी झोतात आली नव्हती. मात्र 2013 मध्ये अभिनेत्रीला टीव्ही विश्वात मोठा ब्रेक मिळाला. 18 जून 2013 मध्ये सुरू झालेल्या ‘जोधा अकबर’ मालिकेमुळे परिधी स्टार झाली.
दोन वर्ष चाहत्यांचं मनोरंजन केल्यानंतर 7 ऑगस्ट 2015 मध्ये मालिकेने चाहत्यांचा निरोप घेतला. मालिका संपून अनेक वर्षे झाले असले तरी देखील मालिकेतील कालाकारांची चर्चा तुफान रंगलेली असते. परिधी आणि रजत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात.