‘जोधा अकबर’ फेम अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला; कुऱ्हाड खेचून हल्लेखोरावरच केला पलटवार, पहा Video

अमनने बऱ्याच पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलंय. त्याचसोबत काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही त्याने भूमिका साकारल्या आहेत. हृतिक रोशन आणि ऐश्वर्या रायच्या 'जोधा अकबर' या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत होता.

'जोधा अकबर' फेम अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला; कुऱ्हाड खेचून हल्लेखोरावरच केला पलटवार, पहा Video
Aman DhaliwalImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 2:14 PM

कॅलिफोर्निया : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये प्रसिद्ध पंजाबी अभिनेता अमन धालिवालवर एका व्यक्तीने कुऱ्हाड आणि चाकूने वार केला. ही घटना बुधवारी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत अमनला दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे. संबंधित व्यक्तीने अमनवर हल्ला का केला, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

हल्ल्याचा व्हिडीओ आला समोर

अमन कॅलिफोर्नियातील ग्रँड ऑक्स परिसरातील एका जिममध्ये वर्कआऊट करण्यासाठी गेला होता. त्यावेळी एक व्यक्ती हातात चाकू आणि कुऱ्हाड घेऊन जिममध्ये आली आणि त्याने अमनवर हल्ला केला. हल्लेखोराने अमनला धरून ठेवलं आणि तो ओरडत राहिला, “मला पाणी द्या, माझा सन्मान करा. मला पाण्याची गरज आहे, तुम्ही माझा फायदा उचलू शकत नाही.”

हे सुद्धा वाचा

हे ओरडत असतानाच हल्लेखोर अमनला चाकू दाखवून धमकी देत होता. हल्लेखोराच्या हालचाली पाहून संधी मिळताच अमन त्याला पकडतो आणि जमिनीवर ढकलतो. त्यानंतर जिममध्ये उपस्थित असलेले इतर लोक आणि सुरक्षा रक्षक येऊन त्याची मदत करतात. मात्र या झटापटीत हल्लेखोराने अमनवर काही वार केले.

पहा हल्ल्याचा व्हिडीओ

अमन हा पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने मॉडेलिंग करत करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तो पंजाबी गाण्यांमध्ये झळकला. अमनने बऱ्याच पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलंय. त्याचसोबत काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही त्याने भूमिका साकारल्या आहेत. हृतिक रोशन आणि ऐश्वर्या रायच्या ‘जोधा अकबर’ या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिकेत होता.

कॅनडाच्या ओंटारियो भागात गेल्या वर्षी 5 डिसेंबर रोजी 21 वर्षीय शीख तरुणीची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाला टारगेट किलिंग मानलं होतं. “मृत तरुणी ब्रँम्पटनची राहणारी पवनप्रीत कौर आहे. मिसिसॉगा शहरात ती तिच्या गाडीमध्ये पेट्रोल भरत होती. त्याचवेळी अज्ञात व्यक्तीने तिच्यावर गोळी झाडली.” त्याआधी अमेरिकेत पंजाबी कुटुंबातील चौघांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.