मुंबईतल्या लिंकिंग रोड परिसरात जॉन अब्राहमने खरेदी केला बंगला; किंमत वाचून विस्फारतील डोळे!

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करतात. आता अभिनेता जॉन अब्राहमने मुंबईतल्या खार इथल्या लिंकिंग रोड परिसरात एक बंगला खरेदी केला आहे. या बंगल्याची किंमत वाचून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. जॉनने घेतलेला हा बंगला लिंकिंग रोडच्या एका प्राइम एरियामध्ये स्थित आहे.

मुंबईतल्या लिंकिंग रोड परिसरात जॉन अब्राहमने खरेदी केला बंगला; किंमत वाचून विस्फारतील डोळे!
John AbrahamImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 01, 2024 | 12:31 PM

मुंबई : 1 जानेवारी, 2024 | गेल्या वर्षी बॉलिवूडमधल्या बऱ्याच सेलिब्रिटींनी नवीन घर घेत प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली. अभिनेत्री आलिया भट्ट ते अनन्या पांडे या सेलिब्रिटींनी नवीन घर खरेदी केलं. या यादीत आता अभिनेता जॉन अब्राहमसुद्धा सहभागी झाला आहे. जॉनने मुंबईतील लिंकिंग रोड, खार याठिकाणी एका बंगल्याची डील निश्चित केली आहे. त्याच्या या बंगल्याची किंमत वाचून तुमचेही डोळे विस्फारतील! जॉनने 27 डिसेंबर रोजी 70.8 कोटी रुपयांचा करार साइन केला होता. त्यानंतर स्टँप ड्युटीसाठी 4.25 कोटी रुपये अधिक दिले होते. त्याने खरेदी केलेल्या जमिनीचा एरिया 7 हजार 722 चौरस फुटांचा आहे तर बंगला 5416 चौरस फुटांवर पसरलेला आहे. या नव्याने घेतलेल्या प्रॉपर्टीचं जॉन नेमकं काय करणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

जॉनची ही नवीन प्रॉपर्टी 372 निर्मल भवन, एक ग्राऊंड आणि दोन मजल्यांचं बांधकाम आहे. ही प्रॉपर्टी नाथलाल शाह अँड फॅमिलीची होती. ‘ई टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रॉपर्टी मार्केटच्या सूत्रांनी सांगितलं की हा प्लॉट लिंकिंग रोडच्या एका प्राइम एरियामध्ये स्थित आहे. शहरातील सर्वांत उंच कमर्शिअल प्रॉपर्टी रेट्सपैकी ते एक आहे. “लिंकिंग रोडवर रिटेल शॉपचं भाडं प्रति चौरस फुटाला 800 रुपयांपेक्षाही अधिक आहे. हे भारतातील सर्वांत महागड्या रिटेल मार्केटपैकी एक आहे”, अशी माहिती ‘लियास फोरास’च्या पंकज कपूर यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

जॉन अब्राहम हा बॉलिवूडमधल्या त्या सेलिब्रिटींच्या यादीत समाविष्ट आहे, ज्यांनी रियल इस्टेटमध्ये बरीच गुंतवणूक केली आहे. 2009 मध्ये त्यांनी एका रतनशास या पारसी कुटुंबीयांकडून पेटिट शाळेजवळ युनियन पार्कमध्ये एक प्राइम प्लॉट खरेदी केला होता. जॉनप्रमाणेच बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांचेही मुंबईत काही बंगले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबईतील ‘प्रतीक्षा’ हा बंगला मुलगी श्वेता नंदाला भेट म्हणून दिल्याचं वृत्त होतं. जुहू परिसरात त्यांचा हा बंगला आहे. 8 नोव्हेंबर रोजी त्यांनी हा बंगला मुलीच्या नावे केला. त्यासाठी त्यांनी 50.65 लाख रुपयांची स्टँप ड्युटी भरली.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....