आज सलमान खान याची पत्नी असती जुही चावला, वडिलांच्या अटीमुळे भाईजानची इच्छा अपूरी
जुही चावला हिच्या वडिलांच्या एका अटीमुळे पूर्ण होवू शकली नाही भाईजानची इच्छा, नाहीतर अभिनेत्री आज असती खान कुटुंबाची सून... सलमान खान आजही एकटा
Juhi Chawla – Salman Khan : 90 च्या दशकात अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) हिने फक्त चाहत्यांच्या मनात नाही तर, अनेक सेलिब्रिटींच्या मनात देखील घर केलं. आज देखील अभिनेत्रीचं सौंदर्य आणि खासगी आयुष्य कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतं. जुही चावला हिने ‘सल्तनत’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्य पदार्पण केलं. त्यानंतर जुहीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. पहिल्या सिनेमानंतर जुही हिने ‘डर’, ‘दीवाना मस्ताना’, ‘इश्क’, ‘हम हैं राही प्यार’ यांसारख्या हीट सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. त्यानंतर अभिनेत्रीने गुपचूप उद्योजक जय मेहता (jay mehata) यांच्यासोबत लग्न केलं आणि सर्वांना थक्क केलं.
जेव्हा जुहीचं लग्न झालं तेव्हा अभिनेता सलमान खान (salman khan) याने देखील जुही हिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. सलमान खान याच्या आयुष्यात अनेक अभिनेत्री आल्या पण तरी देखील अभिनेता आज सिंगल आहे. एक काळ असा देखील होता, जेव्हा सलमान याच्या मनात जुहीसाठी खास जागा होती. (juhi chawla and salman khan relationship)
View this post on Instagram
सलमान जुही हिच्यासोबत लग्न करण्यासाठी देखील तयार होता. पण जुही चावला हिच्या वडिलांमुळे सलमान आणि जुही यांचं लग्न होवू शकलं नाही. लग्नाची मागणी घाल्यासाठी सलमान जुहीच्या घरी देखील होता. पण जुहीच्या वडिलांना सलमान खान जावई म्हणून मान्य नव्हता. नाहीतर, आज सलमान आणि जुही पती – पत्नी असते.
एका मुलाखतीमध्ये सलमान खान याने याबाबत मोठा खुलासा केला होता. ‘जुही प्रचंड प्रेमळ आहे. मी तिच्या वडिलांना आमच्या लग्नाबद्दल विचारलं देखील. पण त्यांनी लग्नाला नकार दिला. कदाचित त्यांना मी आवडत नसेल. माहिती नाही, त्यांना कसा मुलगा हवा होता…’ असं देखील सलमान खान म्हणाला होता.
जुही चावला – जय मेहता
यशाचं शिखर चढत असताना १९९५ साली जुही हिने जय मेहता यांच्यासोबत गुपचून लग्न केलं. पण लग्न झाल्यानंतर ६ वर्ष अभिनेत्रीनं नातं लपवून ठेवंल. जेव्हा जुही चावला पहिल्यांदा गरोदर राहिली, तेव्हा जुही आणि जय मेहता यांच्या लग्नाबद्दल चाहत्यांना कळालं. आज अभिनेत्री वैवाहिक आयुष्यचा आनंद घेत आहे.[
जुही कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहच्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.