Juhi Chawla | प्रसिद्ध अभिनेत्याला सेटवर पाहताच प्रचंड घाबरली होती जुही चावला; त्याआधी नक्की काय झालं होतं?

आज बॉलिवूडपासून दूर कुटुंबासोबत आनंदी असलेली जुही 'या' प्रसिद्ध अभिनेत्याला पाहताच प्रचंड घाबरली होती; खुद्द अभिनेत्रीने सांगितला तो प्रसंग...

Juhi Chawla | प्रसिद्ध अभिनेत्याला सेटवर पाहताच प्रचंड घाबरली होती जुही चावला; त्याआधी नक्की काय झालं होतं?
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 10:38 AM

मुंबई | ‘डर’, ‘ईश्क’, ‘कयामत से कायामत तक’, ‘यस बॉस’, ‘राम जाने’, ‘आईना’, ‘अर्जुन पंडित’, ‘हम हैं राही प्यार के’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत अभिनेत्री जुही चावला हिने चाहत्यांच्या मनात घर केलं. आजही अभिनेत्री चाहत्यांच्या मनात राज्य केलं. जुही आज बॉलिवूडपासून दूर कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत होती. यशाच्या उच्च शिखरावर चढत असताना अभिनेत्रीने अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली. पण एक अभिनेता असा होता ज्याला पाहिल्यानंतर जुही चावला प्रचंड घाबरली होती. सिनेमाच्या सेटवर अभिनेत्याला पाहिल्यानंतर जुही प्रचंड घाबरली होती. पण सिनेमा साईन केल्यामुळे अभिनेत्री माघार देखील घेवू शकत नव्हती.. या प्रसंगाचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एक मुलाखतीत केला.

जुही चावला आणि अभिनेता आमिर खान यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन केलं. जुही आणि आमिर यांची जोडी प्रचंड हीट झाली होती. त्यामुळे ‘राजू बन गया जेंटलमॅन’ सिनेमात देखील दोघांना कास्ट करण्यात आलं. पण काही कारणांमुळे आमिर खान याने सिनेमा करण्यास नकार दिला.

आमिर खान याने सिनेमा करण्यास नकार दिल्यानंतर ‘राजू बन गया जेंटलमॅन’ सिनेमात अभिनेता शाहरुख खान याला कास्ट करण्यात आलं. पण जेव्हा सेटवर अभिनेत्याला जुहीने पहिल्यांदा पाहिल्यानंतर अभिनेत्री घाबरली होती. ‘राजू बन गया जेंटलमॅन’ सिनेमाचे निर्माते सिनेमाचा प्रस्ताव घेवून अभिनेत्री जुही चावला हिच्याकडे गेले होते.

तेव्हा शाहरुख खान याचं कौतुक करत जुही म्हणाली, ‘नवीन मुलगा आहे… प्रसिद्ध आहे… शिवाय आमिर खान याच्यासारखा दिसतो….’ जुहीने शाहरुख बद्दल मनात चॉकलेट बॉयसारखी प्रतिमा तयार केली होती. पण जेव्हा अभिनेत्री सेटवर पोहोचली तेव्हा ती प्रचंड घाबरली. एक सडपातळ, सावळा मुलगा जुहीला दिसला आणि तो बिलकूल आमिर सारखा दिसत नव्हता…

अशात जुहीला तिची फसवणूक झाल्यासारखं वाटलं.. पण सिनेमा सोडण्याचा देखील जुही विचार करु शकत नव्हती. असा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला होता. पण सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांमध्ये चांलगी मैत्री झाली.. एवढंच नाही तर, ‘राजू बन गया जेंटलमॅन’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कामगिरी केली.

सिनेमात जुही आणि शाहरुख यांच्या शिवाय अमृता सिंग, नाना पाटेकर देखील मुख्य भूमिकेते होते. सिनेमाचं कौतुक फक्त चाहत्यांनीच नाही तर, विश्लेषकांनी देखील केलं. ‘राजू बन गया जेंटलमॅन’ सिनेमानंतर जुही आणि शाहरुख यांची घट्ट मैत्री झाली. ‘राजू बन गया जेंटलमॅन’ नंतर दोघांनी ‘डर’, ‘डुप्लीकेट, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘वन टू का फोर’ आणि ‘भूतनाथ’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.