या क्षणाची गेली 13 वर्षे पाहत होते.. जुई गडकरीची भावूक पोस्ट

अभिनेत्री जुई गडकरीने सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. गेल्या 13 वर्षांपासून तिला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, तो क्षण अखेर आला आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी जुईवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

या क्षणाची गेली 13 वर्षे पाहत होते.. जुई गडकरीची भावूक पोस्ट
जुई गडकरीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 2:17 PM

मुंबई : 1 डिसेंबर 2023 | अभिनेत्री जुई गडकरीने नुकतीच सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. गेल्या 13 वर्षांपासून ती ज्या क्षणाची वाट पाहत होती, तो क्षण अखेर तिच्या आयुष्यात आला. आपण केलेल्या कामाची दखल घेतली जावी, अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. यासाठी जुई गेल्या 13 वर्षांपासून प्रतीक्षा करत होती. ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील सायलीच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. टीव्ही 9 मराठीच्या ‘आपला बायोस्कोप’ या पुरस्कार सोहळ्यात जुईला हा सन्मान मिळाला. त्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत.

जुई गडकरी पोस्ट-

’13 वर्षे.. काल टीव्ही9 मराठीचा ‘आपला बायोस्कोप’ पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचं आयोजन खूपच छान होतं. असं वाटलं नाही की हे त्यांचं पहिलं वर्ष आहे. ‘ठरलं तर मग’ला पाच नामांकनं होती. त्यातली सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ही पारितोषिकं आम्ही जिंकलो. प्रत्येकालाच वाटत असतं की आपल्या कामाची निदान दखल कोणीतरी घ्यावी आणि मी तर या क्षणाची गेली 13 वर्षे वाट बघत होते. मी केलेल्या प्रत्येक मालिका छान चालल्या, पण मला कधीच एकही नामांकन मिळालं नाही. मला खूप त्रास व्हायचा या गोष्टीचा. कारण मी खूपच जास्त मेहनत घेत होते. खूप जास्त.. अत्यंत प्रामाणिकपणे काम करत होते. पण ते म्हणतात ना ‘त्याचं’ टायमिंग सगळ्यात बेस्ट असतं आणि तसंच झालं,’ असं तिने लिहिलं आहे.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर जुई नि:शब्द झाली. ‘काल मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला हे अजूनही सिंकईन होतंय. ब्लँक, शांत वाटतंय. खूप गरजेची होती ही कौतुकाची थाप. मला अजून मनापासून काम करायला नवीन ऊर्जा मिलाली. धन्यवाद टीव्ही9 मराठी. मी नि:शब्द झाले. माझ्यासाठी ज्यांनी वोटिंग केलं, त्यांचेही आभार, तसंच परिक्षकांचेही आभार. तुम्ही मला बळ दिलंत पुढे अजून छान काम करायला. ‘सायली’ला घडवल्याबद्दल लेखकांचं, दिग्दर्शकांचं आभार. मी नेहमीच म्हणते की मला सर्वोत्तम टीम मिळाली आहे आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. त्यांच्यामुळे काम करायला मज्जा येते. माझी साथ दिल्याबद्दल प्रत्येकाचे आभार. मला भेटलेले तुम्ही सर्वोत्तम सहकलाकार आहात.’ अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

‘ठरलं तर मग’ ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. यामध्ये जुईने सायलीची भूमिका साकारली आहे. या मालिकेत सध्या सायली आणि अर्जुन यांच्या डिनर डेटचा सीक्वेन्स सुरू आहे. अर्जुनला सायली सरप्राईज देते आणि ते पाहून तो भारावून जातो. या डिनर डेटमुळे दोघांचं नातं आणखी बहरणार आहे.

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.