‘कच्चा बदाम’ फेम अंजली अरोराच्या कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

मध्यंतरीच्या काळात अंजलीचा एमएमएस व्हिडीओ व्हायरल झाल्याचंही म्हटलं जात होतं. त्यानंतर आता तिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या फोटोमध्ये ती एका लहान बाळासोबत पहायला मिळतेय.

'कच्चा बदाम' फेम अंजली अरोराच्या कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Anjali AroraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 1:08 PM

मुंबई : ‘कच्चा बदाम’ या सोशल मीडियावर तुफान गाजलेल्या गाण्यावर डान्स करत प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री अंजली अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. टिक-टॉक आणि इन्स्टाग्राम रिल्समुळे तिला चांगली ओळख मिळाली. इन्स्टाग्रामवर तिने 12 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर कंगना रनौतच्या ‘लॉक अप’ या शोमुळेही ती चर्चेत आली होती. मध्यंतरीच्या काळात अंजलीचा एमएमएस व्हिडीओ व्हायरल झाल्याचंही म्हटलं जात होतं. त्यानंतर आता तिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या फोटोमध्ये ती एका लहान बाळासोबत पहायला मिळतेय.

अंजलीच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्याचाच आनंद तिने हा फोटो शेअर करत व्यक्त केला आहे. अंजलीच्या या फोटोला अडीच लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर कमेंट्समध्ये अनेकजण तिला शुभेच्छा देत आहेत. हे बाळ नेमकं कोणाचं आहे, असाही सवाल काही नेटकऱ्यांनी केला आहे. मात्र फोटोमध्ये दिसणारं बाळ हे अंजलीचं नसून तिच्या भावाचं आहे. अंजली आत्या झाली आणि त्याचाच आनंद तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

हे सुद्धा वाचा

अंजलीने या फोटोच्या कॅप्शनमध्येही स्पष्ट केलं आहे की ती आत्या झाली आहे. या फोटोमध्ये सोफ्यावर बसलेली अंजली बाळाकडे आनंदाने पाहताना दिसत आहे. अंजलीने कॅप्शनमध्ये स्पष्ट केलं असलं तरी काहींनी या फोटोवरून संभ्रम व्यक्त केला आहे. ‘तुझं बाळ तुझ्याइतकंच क्यूट असेल’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘तुझं बाळ कसं काय? तू लग्न कधी केलंस’, असा सवाल काही युजर्स करत आहेत.

अंजली अरोराला सोशल मीडियातून प्रसिद्धी मिळाली. ‘कच्चा बदाम’ गाण्यावरील डान्समुळे रातोरात प्रकाशझोतात आल्यानंतर अंजलीला ‘लॉक अप’ या रिॲलिटी शोची ऑफर मिळाली. या शोमध्ये तिने तिच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे केले होते.

अंजली आणि स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी यांच्यातील नातं लोकांना खूप आवडलं आणि दोघांच्या नावाने हॅशटॅगही बनवण्यात आला. इतकंच नव्हे तर अंजलीने मुनव्वरला प्रपोजही केलं होतं. मात्र शो संपल्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला. काही दिवसांपूर्वी अंजली तिच्या एमएमएस व्हिडीओ लीकमुळेही चर्चेत आली होती.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.