Kajol | प्लास्टिक सर्जरीबद्दल काजोलचा तरुण अभिनेत्रींना मोलाचा सल्ला; म्हणाली “देवाने तुम्हाला..”

काजोल सध्या 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटाचं प्रमोशन करतेय. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत काजोल प्लास्टिक सर्जरीबद्दल व्यक्त झाली. या मुलाखतीत तिने तरुण अभिनेत्रींना प्लास्टिक सर्जरीबद्दल मोलाचा सल्ला दिला आहे.

Kajol | प्लास्टिक सर्जरीबद्दल काजोलचा तरुण अभिनेत्रींना मोलाचा सल्ला; म्हणाली देवाने तुम्हाला..
Kajol Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 10:14 AM

मुंबई : अभिनेत्री काजोल तिच्या दमदार अभिनयकौशल्यासोबतच बेधडक मतं मांडण्यासाठी ओळखली जाते. चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे विषय असो किंवा पापाराझी कल्चर.. काजोलने नेहमीच मोकळेपणे त्यावर वक्तव्य केलंय. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तरुण अभिनेत्रींना प्लास्टिक सर्जरीबद्दल मोलाचा सल्ला दिला आहे. काजोल सध्या ‘लस्ट स्टोरीज 2’ या चित्रपटाचं प्रमोशन करतेय. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत काजोल प्लास्टिक सर्जरीबद्दल व्यक्त झाली. ती म्हणाली, “देवाने तुम्हाला एका विशिष्ट प्रकारे बनवलं आहे आणि तुम्हाला हव्या असलेल्या ज्या गोष्टी देवाने दिल्या नसतील त्यासाठी मेकअप आहे.”

प्लास्टिक सर्जरीबद्दल काय म्हणाली?

इतरांनी सांगितलं म्हणून सर्जरी करू नका, असा सल्ला तिने दिला आहे. “प्लास्टिक सर्जरी करावी की नाही ही वैयक्तिक निवड असावी. कारण 25 लोक तुम्हाला कर असं म्हणतायत म्हणून तुम्ही तो निर्णय घेऊ नये”, असं ती म्हणाली. या मुलाखतीत काजोल पापराझी कल्चरविषयीही मोकळेपणे व्यक्त झाली. पहिल्यांदा जेव्हा काजोलची मुलगी निसाला पापाराझींनी क्लिक केलं, तेव्हा ती रडत होती, असं तिने सांगितलं. निसा दोन वर्षांची असताना जयपूरमध्ये हा प्रसंग घडला होता.

पापाराझी कल्चरबद्दल मांडलं मत

“निसा त्यावेळी दोन वर्षांची होती. आम्ही जयपूरला गेलो होतो आणि त्यावेळी आमच्यासोबत कोणतीच सुरक्षाव्यवस्था नव्हती. अचानक 20 ते 25 पापाराझी आले आणि त्यांनी आम्हाला घेरलं. त्यांचा गोंधळ पाहून निसाला रडू कोसळलं. मी तिला उचललं आणि थेट कारच्या दिशेने चालू लागले. ही लोकं तुला काहीच करणार नाही, असं मी तिला समजावत होते. म्हणून मी माझ्या मुलांना त्यांच्यापासून लांब ठेवते. पण अनुभवांतून ती आता बरंच काही शिकतेय. अनुभवांतून जे शिकता येतं ते मी त्यांना शिकवून येणार नाही”, असं काजोल म्हणाली.

हे सुद्धा वाचा

फीमेल प्लेजरबद्दल काजोल झाली व्यक्त

‘लस्ट स्टोरीज 2’च्या प्रमोशननिमित्त दिलेल्या आणखी एका मुलाखतीत काजोलने फीमेल प्लेजरबद्दलही मत मांडलं होतं. “एकेकाळी समाज म्हणून आपण याबद्दल खूप मोकळे होतो. आपल्या प्राचीन ग्रंथांचा आणि शिक्षणाचा तो एक भाग होता. मात्र नंतर आपण स्वत:ला त्यापासून दूर केलं. पण आपल्या आयुष्याचा हा अत्यंत सामान्य भाग आहे. खाण्यापिण्याच्या गप्पांप्रमाणेच आपण स्त्रियांच्या कामतृप्ततेबद्दल मोकळेपणे बोलायला हवं. त्या विषयावर बोलणं बंद करण्यापेक्षा संवादात त्याचा उल्लेख करण्याविषयी मोठा प्रश्न आहे. त्याबद्दल न बोलल्याने उलट त्याकडे अधिक लक्ष वेधलं जातं”, असं ती म्हणाली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.