वयाच्या 45 व्या वर्षी देखील अविवाहित आहे काजोल हिची बहीण, आई होण्यासाठी घेतला मोठा निर्णय

अविवाहित असलेल्या काजोल हिच्या बहिणीने आई होण्यासाठी घेतला मोठा निर्णय... सध्या सर्वत्र तनीषा मुखर्जी आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा... स्टारकिड असूनही अभिनेत्रीला नाही मिळाली प्रसिद्धी आणि लोकप्रियता... वयाच्या 45 व्या वर्षी देखील जगतेय एकटीच

वयाच्या 45 व्या वर्षी देखील अविवाहित आहे काजोल हिची बहीण, आई होण्यासाठी घेतला मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 12:41 PM

मुंबई | 10 नोव्हेंबर 2023 : अभिनेत्री काजोल हिची बहीण तनीषा मुखर्जी (Tanishaa Mukerji) बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करु शकलं नाही. तनीषा हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली पण चाहत्यांनी अभिनेत्रीला प्रेम दिलं नाही. त्यानंतर अभिनेत्री ब्रेक घेतला. आज तनीषा मुखर्जी बॉलिवूडपासून दूर असली तरी अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या अभनेत्री ‘झलक दिखला जा सीजन 11’ शोच्या माध्यमातून स्वतःचं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहे.

‘झलक दिखला जा सीजन 11’ शोमध्ये तनीषा हिची कामगिरी चाहत्यांना आवडते की नाही… ही गोष्ट येणारा काळच ठरवेल. सध्या तनीषा फक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये तनीषा हिला स्वतःचं स्थान निर्माण करता आलं नाही. पण खासगी आयुष्यात देखील अभिनेत्रीला यश मिळालं नाही.

वयाच्या 45 व्या वर्षी तनीषा एकटी राहते. पण आई होण्यासाठी अभिनेत्रीने एग्स फ्रिज केले आहेत. अभिनेत्री म्हणाली, ‘एग्स फ्रिज करण्याच्या प्रक्रियेत मी स्वतःचे वजन वाढवलं होतं. गरोदर महिला प्रचंड सुंदर दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर असणार ग्लो मला फार आवडतो…’ असं अभिनेत्री एका मुलाखतीत म्हणाली होती.

हे सुद्धा वाचा

नेपोटिजमवर तनीषा मुखर्जी हिचं मोठं वक्तव्य..

‘नेपोटिझम एक अर्थ नसलेला शब्द आहे. नेपोटिझम एक फॅन्सी शब्द आहे. ज्याचा वापर लोकं कायम करताना दिसतात. प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. एक चांगली बाजू आणि एक वाईट बाजू… जे स्टारकिड नसतात ते कलाकार स्वतःची भक्कम ओळख निर्माण करतात, पण काही स्टारकिड्स प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवू शकत नाहीत…’ असं देखील तनीषा म्हणाली…

तनीषा मुखर्जी हिचे सिनेमे

तनीषा मुखर्जी हिने ‘Neal n nikki’, ‘वन टू थ्री’, ‘सरकार’, ‘बी केअरफूल’, ‘सरकार राज’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण तनीषा हिला बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करता आलं नाही.

तनीषा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.