काजोल हिच्या आईची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात उपचार सुरु
Kajol Mother : वयाच्या 80 व्या वर्षी खालावली अभिनेत्री काजोल हिच्या आईची प्रकृती... रुग्णालयात उपचार सुरु, सध्या सर्वत्र काजोल हिच्या आईच्या प्रकृतीची चर्चा... सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून चिंता व्यक्त... आता कशी आहे तनुजा यांची प्रकृती?
मुंबई | 18 डिसेंबर 2023 : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिची आई तनुजा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. तनुजा सध्या जुहू रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळत आहे. 80 वर्षीय अभिनेत्रीवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. तनुजा यांची प्रकृती ठीक नसल्याने रविवारी संध्याकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तनुजा यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर आल्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटी आणि आणि चाहते चिंता व्यक्त करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या आईच्या प्रकृतीची चर्चा सुरु आहे.
रिपोर्टनुसार, तनुजा यांना जुहू रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. वयाच्या काही समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता मिळत असलेल्या माहितीनुसार, तनुजा यांची प्रकृती स्थिर असून, काळजी करण्याचं काहीही कारण नाही… असं डॉक्टर म्हणाले आहेत. काजोल, तनिषा आणि अजय देवगण, तनुजा यांच्या उपचारावर लक्ष ठेवून आहेत.
तनुजा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचा जन्म 23 सप्टेंबर 1943 मुंबई याठिकाणी झाला. मराठी कुटुंबात जन्मलेल्या तनुजा यांचे आई – वडील देखील इंडस्ट्रीमधील आहे. तनुजा चित्रपट निर्माते कुमारसेन समर्थ आणि अभिनेत्री शोभना समर्थ यांची मुलगी आहे. आई – वडिलांप्रामाणे तनुजा यांनी देखील अभिनय क्षेत्रात करियर केलं आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
तनुजा यांनी बहीण नूतनसोबत ‘हमारी बेटी’ या सिनेमातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. बॉलिवूडमध्ये करियर करत असताना तनुजा यांनी 1973 मध्ये चित्रपट निर्माता शोमू मुखर्जी यांच्याशी लग्न केलं. तनुजा यांना दोन मुली आहेत. काजोल आणि तनिषा मुखर्जी अशी त्यांची नावे आहेत.
तनुजा यांची मोठी मुलगी म्हणजे काजोल हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. काजोल हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पूर्वीप्रमाणे काजोल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.
तनुजा यांची लहान मुलगी, तनिषा मुखर्जी हिने देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण आई आणि मोठ्या बहिणीप्रमाणे तिला स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. तनिषा मुखर्जी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.