‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही…’, Rahul Gandhi यांच्या ‘भारत जोडो यात्रे’त प्रसिद्ध अभिनेत्री सहभागी
'आओ मिलकर जोडे अपना भारत', राहूल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'त अनेक दिग्गज व्यक्तींनंतर प्रसिद्ध अभिनेत्री सहभागी
Bharat Jodo Yatra: काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरू आहे. या यात्रेत अनेक लोक सहभागी होत आहेत. कॉंग्रेस नेते राहूल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी भारत जोडो हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. भारत जोडो यात्रेमध्ये आतापर्यंत अनेक दिग्गज व्यक्ती सहभागी झाले. एवढंच नाही, तर अनेक कलाकार देखील भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले आहे. अभिनेत्री पूजा भट्ट, रिया सेन, रश्मी देसाई आणि स्वरा भास्कर नंतर अभिनेत्री काम्या पंजाबी (Kamya Punjabi) राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाली आहे.
काम्या पंजाबीने सोशल मीडियावर भारत जोडो यात्रेचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत.सध्या काम्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. राहूल गांधी यांची यात्रा उत्तर प्रदेशच्या रत्स्यावर होती, तेव्हा यात्रेमध्ये काम्याने प्रवेश केला. सांगायचं झालं तर गेल्या वर्षी काम्याने काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
दरम्यान, यात्रेत सहभागी झाल्यानंतर अभिनेत्रीने माध्यमांसोबत संवाद देखील साधला. अभिनेत्री म्हणाली, ‘भारत जोडो यात्रा एक महत्त्वाचा टप्पा आहे. अनेक व्यक्तींना यात्रेत सहभागी व्हायचं आहे, पण त्यांच्या मनात भीती आहे. यात्रेत सहभागी झाल्यानंतर पुढे ट्रोल होण्याची चिंता त्यांच्या मनात आहे. ‘
पुढे राहूल गांधींबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राहूल गांधी सर्वांसोबत संवाद साधतात. लोक त्यांना फार जवळचं मानतात. म्हणून त्यांना साथ देण्यासाठी मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. ‘ अभिनेत्री ट्विट करत म्हणाली, ‘आओ मिलकर जोडे अपना भारत..’ सध्या अभिनेत्रीने केलेलं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आओ मिलकर जोड़े अपना भारत #BharatJodoyarta @RahulGandhi @priyankagandhi https://t.co/ikiJNWp9Qr
— Kamya Shalabh Dang (@iamkamyapunjabi) January 4, 2023
कोण आहे काम्या पंजाबी? काम्याने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. अनेक वर्ष अभिनय केल्यानंतर अभिनेत्री काम्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि चरणसिंग सपरा यांसारख्या अन्य नेत्यांनी पंजाबींचे पक्षात स्वागत केलं.
बिग बॉसमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या काम्याने ‘बनून में तेरी दुल्हन’, ‘मर्यादा: लेकीन कब तक’, ‘शक्ती-अस्तित्व के एहसास की’, ‘रेठी’, ‘अस्तित्व… एक प्रेम कथा’, पिया का घर’ आणि ‘क्यों’. होता है प्यार’ अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
मालिकाच नाही, तर काम्याने सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘कोई मिल गया’, ‘ना तुम जानो ना हम’, ‘यादे’ या सिनेमांमध्ये अभिनेत्री महत्त्वाची भूमिका साकारली आहे.