Kangana Ranaut | कंगनाची मुंबईवारी, पुन्हा रंगणार ‘सामना’?

थलावली चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर कंगना रनौत गेल्या काही महिन्यांपासून मनाली येथे तिच्या घरी होती. मात्र, आता ती मुंबईला परतली आहे.

Kangana Ranaut | कंगनाची मुंबईवारी, पुन्हा रंगणार 'सामना'?
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 10:03 AM

मुंबई :  कंगना रनौत (Kangana Ranaut) चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून मनाली येथे तिच्या घरी होती. मात्र, आता ती मुंबईला परतली आहे. रविवारी कंगना मुंबईत दाखल झाली आहे. त्याच्याबरोबर बहीण रंगौली आणि कुटुंबातील काही सदस्यही मुंबईला तिच्यासोबत परतले आहेत. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये कंगना रनौत मुंबई विमानतळावर दिसत आहेत. यावेळी तिने राखाडी रंगाचा कोट घातलेला दिसत आहे. (Kangana Ranaut arrives in Mumbai)

गेल्या कित्येक दिवसांपासून कंगना रनौत तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कंगनाने टिका केली होती त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता आणि असातच कंगना मुंबईत दाखल झाली आहे.

कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात कंगनाला चांगलंच फैलावर घेतलं होत. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान आहे. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायंचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची. मुंबईत अनधिकृत बांधकामं करायची. हिंमत असेल तर पाकव्यात काश्मीर सोडा. काश्मीरमध्ये अधिकृत बांधकाम करुन दाखवा, अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी कंगनावर जोरदार प्रहार केला होता.

त्यानंतर कंगनाने देखील ट्विटरवरुन जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यामध्ये ती म्हणाली होती की, मुख्यमंत्री देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत, एवढेच नाहीतर पुढे म्हणाली होती की, यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कुणी बनवलं? ते महाराष्ट्र स्वत:च्या मालकीचा असल्याचासारखं का वागतात.

मुख्यमंत्री, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. लोकसेवक असून तुम्ही अगदी शुल्लक गोष्टींवरुन संघर्ष करत आहात. तुमच्याजवळ असलेली सत्ता तुमच्या मताशी सहमत नसलेल्यांचा अपमाप करण्यासाठी, त्यांना हानी पोहोचवण्यासाठी वापरत आहात. घाणेरडं राजकारण करुन मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही. तुम्हाला लाज वाटायला हवी”, अशा शब्दात कंगनाने मुख्यमंत्री उदय ठाकरे यांच्यावर टिका केली होती.

संबंधित बातम्या : 

Rajinikanth Health | रजनीकांत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार?

Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार?

(Kangana Ranaut arrives in Mumbai)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.