Shahrukh Khan याच्या वडिलांबद्दल कंगना रनौत हिला असं काय कळलं, ज्यामुळे अभिनेत्रीला बसला धक्का
Shahrukh Khan | एक फोटो पोस्ट करत कंगना रनौत हिने अभिनेता शाहरुख खान याच्या वडिलांबद्दल केलं मोठं वक्तव्य... आमिर खान याचं खास कनेक्शन... सध्या सर्वत्र कंगना रनौत हिच्या पोस्टची चर्चा...
मुंबई | 25 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या करणामुळे चर्चेत असते. कंगना ही चालू किंवा तिला खटकणाऱ्या मुद्द्यांवर स्पष्ट मत मांडत असते. अभिनेत्रीने दिग्दर्शक करण जोहर, बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजी विरोधात अनेकदा आवाज उठवला आहे. अभिनेत्रीने अनेकांवर टीका देखील केली आहे. पण आता अभिनेत्रीने कोणत्या सेलिब्रिटींवर निशाणा साधला नाही तर, अभिनेता शाहरुख खान याच्या वडिलांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय अभिनेता आमिर खान याचं असलेलं कनेक्शन देखील अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे. सध्या सर्वत्र कंगना रनौत हिच्या पोस्टची चर्चा रंगत आहे.
कंगना हिने एका फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने किंग खान याच्या वडिलांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्रीच्या पोस्टनुसार, शाहरुख खान याचे वडील ताज मोहम्मद यांनी १९५७ मध्ये गुडगाव याठिकाणी लेकसभा निवडणूक लढवली होती.
शाहरुख खान याचे वडील ताज मोहम्मद यांनी लेकसभा निवडणूक मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विरोधात वढवली होती. पण ही निवडणूक शाहरुख खान याचे वडील जिंकू शकले नाहीत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अभिनेता आमिर खान मौलाना आझाद यांच्या कुटुंबातील आहे. ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. कंगनाची पोस्ट सध्या चर्चेत आहे.
कंगना हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘इमर्जन्सी’ या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणारआहे, ज्यामध्ये अभिनेत्री माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात कंगना हिच्यसोबत अनुपम खेर, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘इमर्जन्सी’ कंगना ‘तेजस’ आणि ‘चंद्रमुखी 2’ सिनेमात देखील दिसणार आहे. ‘चंद्रमुखी 2’ हा तमिळ सिनेमातील हिट हॉरर सिनेमा ‘चंद्रमुखी’ चा सिक्वेल आहे, ज्यामध्ये रजनीकांत आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत आहेत. ‘चंद्रमुखी 2’ मधील कंगनाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे.
शाहरुख खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, किंग खान लवकरच ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेत्री दीपिका पादुकेण, नयनतारा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.