Kangana Ranaut | हिंदुत्वावर बोलण्याची कंगनाने चुकवली मोठी किंमत; एकारात्रीत इतक्या कोटींच नुकसान

कंगना रनौत, हिंदुत्व, राजकारण आणि बरंच काही... बेधडक वक्तव्यांमुळे अभिनेत्रीने चुकवली मोठी किंमत, खुद्द अभिनेत्रीने झालेल्या नुकसानाबद्दल केलं मोठं वक्तव्य...

Kangana Ranaut | हिंदुत्वावर बोलण्याची कंगनाने चुकवली मोठी किंमत; एकारात्रीत इतक्या कोटींच नुकसान
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 4:17 PM

मुंबई : ‘फॅशन’, ‘तनू वेड्स मनू’, ‘शूट आऊट अट वडाळा’, ‘क्रिश ३’, ‘क्विन’, ‘धडक’ यांसारख्या अनेक सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री कंगना रानौत आज बॉलिवूडमधील फार मोठं नाव आहे. कंगना हिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. बॉलिवूडची क्विन म्हणून ओळख असलेली कंगना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कायम वादाचा मुकूट आपल्या डोक्यावर घेवून मिरवणारी कंगना अनेक मुद्द्यांवर स्वतःचं परखड मत मांडत असते.. एवढंच नाही तर वादग्रस्त वक्तव्यांमुळे अभिनेत्रीला अनेक चढ – उतारांचा सामना देखील करावा लागाला. शिवाय अभिनेत्रीचं कोट्यवधींचं नुकसान देखील झालं आहे.. या गोष्टीची खुलासा खुद्द कंगना रनौत हिने केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत हिची चर्चा सुरु आहे…

हिंदुत्व, राजकारणी, टुकडे टोळी यांच्या विरोधात आवाज उठवण्याची किंमत मी चुकवली आहे, असं कंगना म्हणाली आहे.. स्पष्टपणे बोलल्यामुळे अनेक ब्रँडच्या जाहिराती गमवाव्या लागल्या आणि त्यामुळे 30 ते 40 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे…

कंगना रनौत हिने इन्स्टाग्रामवर इलॉन मस्क यांची एक बातमी शेअर करत मोठा खुलासा केला आहे. बातमीमध्ये इलॉन मस्क यांनी म्हटलं आहे की, ‘मला जे वाटेल ते मी बोलेल. भले त्यासाठी मला आर्थिक नुकसान सहन कराला लागला तरी चालेल…’ याच आधारावर कंगनाने स्वतःच्या नुकसानाबद्दल सांगितलं आहे…

हे सुद्धा वाचा

कंगना म्हणाली, ‘खरे स्वातंत्र्य आणि यशाचं वैशिष्ट्य आहे हेच आहे… हिंदुत्वासाठी बोलणे, राजकारणी, देशद्रोही, तुकडे टोळी यांच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे मला 20-25 ब्रँडच्या जाहिरातींमधून काढून टाकण्यात आले. एका रात्रीत त्यांनी मला बाहेरचा रस्ता दाखवला… यामुळे माझं दरवर्षी 30 ते 40 कोटी रुपयांच्या नुकसानाचा सामना करावा लागला.. ‘

एवढंच नाही तर, कंगनाने दावा केला आहे की, तिच्यासोबत हे सर्व घडले असलं तरी ती स्वतंत्र आहे आणि तिला जे बोलायचे आहे ते बोलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पोस्टमध्ये अभिनेत्रीने इलॉन मस्कचं कौतुक केलं. पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘प्रत्येक जण स्वतःची पडती बाजू मांडतो.. निदान श्रीमंतांनी तरी पैशाचा विचार करू नये.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

कंगना रनौत हिच्या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री २०२२ मध्ये ‘धडक’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली. अभिनेत्रीचा आगामी सिनेमा ‘इमर्जन्सी’चं शुटिंग पूर्ण झालं आहे. सिनेमात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.. अभिनेत्री लवकरच ट्रेलरसोबतच रिलीज डेटही जाहीर करणार आहे…

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.