Kangana Ranaut ‘जेव्हा मी सत्तेत येईल तेव्हा…’, कंगनाच्या धक्कादायक वक्तव्यानंतर सर्वत्र खळबळ

सत्तेत आल्यानंतर सर्वात आधी कंगना रनौत साधणार 'या' व्यक्तींवर निशाणा... अनेकांविराधात पुरेसे पुरावे असल्याचा अभिनेत्रीकडून दावा... सध्या सर्वत्र कंगना रनौत हिची चर्चा..

Kangana Ranaut 'जेव्हा मी सत्तेत येईल तेव्हा...', कंगनाच्या धक्कादायक वक्तव्यानंतर सर्वत्र खळबळ
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 2:18 PM

मुंबई | अभिनेत्री कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली कंगना सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. वादाचा मुकूट कायम आपल्या डोक्यावर घेवून मिरवणारी अभिनेत्री कंगनाने आता देखील प्रसिद्ध सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे. ‘सत्तेत आल्यानंतर सर्वांचं पितळ उघडं करेल…’ असं वक्तव्य अभिनेत्रीने केल आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे इन्स्टाग्राम स्टोरीवर अभिनेत्रीने खळबळजनक वक्तव्य केलं आहे. शिवाय अभिनेत्रीने बॉलिवूडमधील काही लोकांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूत याला स्वतःला संपवण्यासाठी प्रवृ्त्त केल्याची चर्चा देखील जोर धरत आहे..

कंगना सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली, ‘कालच्या कथेबद्दल मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे.. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रकारचे धोके आहेत. यामध्ये दुर्योधन आणि शकुनी मामा यांची जोडी आहे. यापेक्षा आणखी वाईट काय होवू शकतं.  संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला हे माहीत आहे, ते सुशांत सिंग राजपूतविरुद्धच्या सर्व बनावट गोष्टींमागे प्रमुख संशयित होते… ज्यांनी सुशांतला स्वतःला संपवण्यासाठी प्रवृ्त्त केलं…

धक्कादायक गोष्ट म्हणजे याठिकाणी अभिनेत्रीने रणबीर कपूर याचा उल्लेख ‘दुर्योधन’ तर करण जोहर याचा उल्लेख ‘शकुनी मामा’ म्हणून केला आहे. पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘त्यांनी माझ्या विरोधात वाईट अपफवा पसरवल्या. माझ्या आणि अभिनेता हृतीक रोशनच्या भांडणात पंचाची भूमिका पार पाडली..त्यानंतर दोघांनी माझ्या करिअर आणि आयुष्यात दखल देण्यास सुरुवात केली.’

हे सुद्धा वाचा

‘मी माझ्या गुप्तहेरांचा पर्दाफाश केल्यापासून, माझ्याविरुद्धचा वाईट बातम्या मोठ्या प्रमाण कमी झाल्या आहेत.. आज मी अशा स्थितीत आहे. पण जेव्हा मी सत्तेत येईल तेव्हा अशा लोकांचं पितळ उघड करेल. त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पुरावे आहेत. माझी साथ देण्यासाठी आभार मानते.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

दरम्यान, नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये रामच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरची निवड करण्यात आली आहे. यामुळे कंगनाने विरोध दर्शवल्याची चर्चा रंगत आहे. ‘रामायण’मध्ये रामच्या भूमिकेत रणबीर तर सीता यांच्या भूमिकेत अभिनेत्री आलिया भट्ट झळकणार आहे. सध्या सर्वत्र ‘रामायण’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

कंगना सोशल मीडियावर  कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम अनेक मुद्द्यांवर स्वतःचं मत मांडत असते…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.