AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीपिकाचा ‘गहराइयां’ कंगनाला पोर्नोग्राफीसारखा का वाटतो?, म्हणून आता कंगानाच्या निशाण्यावर दीपिका…

बॉलीवूडमधील दिग्गजांकडून पंगा घेणारी कंगना रनौतने पुन्हा एकदा आपल्या निशाणावर दीपिका पदुकोनला घेतले आहे. दीपिकाचा नुकताच गहराइयां (Gehraiyaan) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 

दीपिकाचा 'गहराइयां' कंगनाला पोर्नोग्राफीसारखा का वाटतो?, म्हणून आता कंगानाच्या निशाण्यावर दीपिका...
| Edited By: | Updated on: Feb 13, 2022 | 8:07 PM
Share

मुंबईः कंगना रनौत (Kangana Ranaut) म्हणजे नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. ती नेहमीच वादग्रस्त मुद्यावरुन माध्यमांच्या चर्चेत येते. चित्रपट असू दे की राजकारण तिला जे म्हणायचं आहे ते ती सरळ आणि बिनधास्तपणे बोलत राहते. कधी कधी तिच्या या वक्तव्यामुळे लोक त्रस्त होऊन जातात तर कधी कधी ती नको इतकी आक्रमक होऊन जाते. यावेळी तिने दीपिका पदुकोनवर आपला निशाना साधला आहे. दीपिकाचा (Deepika Padukone) नुकताच गहराइयां (Gehraiyaan) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्या चित्रपटानंतरच दीपिका पुन्हा चर्चेत आली आहे, मात्र आता या चित्रपटाच्या चर्चेत कंगनाने उडी घेतली आहे.

दीपिकाच्या गहराइयां या चित्रपटाला कंगनाने खराब चित्रपटाचा दर्जा दिला आहे, आणि गहराइयांची तुलना तिने पोर्नोग्राफीबरोबर केली आहे. त्यामुळे या तिच्या वक्तव्यामुळे गहराइयां आणखी चर्चेत आला आहे. कंगनाने त्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल दीपिकावर निशाना साधला आहे. कंगना रनौतने गहराइयां चित्रपटावर निशाना साधताना मनोज कुमार यांच्या चित्रपटातील हिमालय की गोद मधील गाणं चाँद सी महबूबा हे गीत शेअर केले आहे. त्यावर तिने लिहिले आहे की, मैं भी इसी पीढ़ी की हूं, लेकिन इस तरह के रोमांस को समझती हूं. नई पीढ़ी/युवाओं/शहरी फिल्मों के नाम कर कचरा मत बेचो प्लीज, बुरी फिल्में बुरी फिल्में ही हैं. कोई भी अंग प्रदर्शन या पोर्नोग्राफी भी इसे बचा नहीं सकती है.. यह एक बुनियादी फैक्ट है कोई गहराइयां वाली बात नहीं है, असं म्हणत तिने गहराइयां चित्रपटावर निशाना साधला आहे.

बॉलीवू़डवर सावत्रपणाचा ठपका

कंगनाच्या आधीपासूनच ती बॉलीवू़डवर सावत्रपणाचा ठपका ठेवत असते. यावेळी मात्र तिच्या या निशाणावर दीपिका आणि तिचा गहराइयां चित्रपट आहे. या तिच्या वक्तव्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

अभिनयाचं कौतूक पण

कंगना रनौत सध्या अनेक चित्रपटातून काम करत आहे. ती सध्या नवाजुद्दीन सिद्दीकी बरोबर एका चित्रपटात काम करत आहे. तसेच ती धाकड चित्रपटात वेगळ्या भूमिकेत प्रेषकांसमोर येत आहे.तर भारतीय वायुसेनेतील एका पायलटच्या आयुष्यावर बनलेली तेजसमध्येही ती दिसणार आहे. तिचा सध्या थलैवी आल्यानंतर तो बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरला होता, मात्र तिच्या अभिनयाचं कौतूक करण्यात आले होते.

संबंधित बातम्या

राजश्री खरात होय तिच, फँड्रीतील साधी भोळी शालू, आता नव्या लूकमध्ये बघाल तर विश्वास बसणार नाही…

राजकीय मेळाव्यांना खच्चून गर्दी होते, रेस्टॉरंट, पब्ज सुरू आहेत, मग चित्रपटगृह का सुरू होत नाही?; मनसेचा सवाल

प्राजक्ता माळी मुख्यमंत्र्यांना म्हणते शिवजयंतीनिमित्त तुम्ही रंगकर्मींना आनंदी बातमी द्या; आम्हालाच तेवढा वेगळा नियम का? प्राजक्ताचा सवाल

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.