AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Confirm…! कंगना रनौत लढणार लोकसभा निवडणूक, वडिलांकडून मोठा खुलासा

Kangana Ranaut : कंगना रनौत हिचा प्रवास राजकारणाच्या दिशेने... कोणत्या मतदार संघातून लढवणार 2024 मधील लोकसभा निवडणूक? अभिनेत्रीच्या वडिलांकडून मोठी माहिती समोर... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत हिची चर्चा...

Confirm...! कंगना रनौत लढणार लोकसभा निवडणूक, वडिलांकडून मोठा खुलासा
| Updated on: Dec 20, 2023 | 10:54 AM
Share

मुंबई | 20 डिसेंबर 2023 : अभिनेत्री कंगना रनौत हिच्यासाठी 2024 हे वर्ष फार खास असणार आहे. कारण बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कन स्थान निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीचा प्रवास राजकारणाच्या दिशेने वळणार असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री खासदार होण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचा दावा लोक करत होते. आता अभिनेत्रीच्या वडिलांनी यावर मोठं वक्तव्य केलं आहे. कंगना भाजप पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र कोणत्या जागेवरून, हे अद्याप ठरलेले नाही.

अमरदीप रनौत यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहे. पण कंगना कोणत्या मतदार संघातू निवडून लढवेल.. हे अद्याप पक्षाला ठरवायचं आहे. सांगायचं झालं तर, रविवारी कंगना हिने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची कुल्लू मधील शास्त्रीनगर येथील निवासस्थानी भेट घेतली. तेव्हापासून कंगना भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, आता ती पुढील वर्षी निवडणूक लढवणार असल्याचं तिच्या वडिलांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

कोणत्या तिकिटावर कंगना लढवणार निवडणूक?

कंगना कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करताना दिसते. सोशल मीडियावर अभिनेत्री भाजप पक्षाच्या बाजूने पोस्ट देखील करत असते. म्हणून अभिनेत्री यंदा निवडणूक नक्की लढवणार… अशी चर्चा चाहत्यांमध्ये होती. शिवाय हिमाचल येथे पार पडलेल्या RSS च्या एका कार्यक्रमात देखील अभिनेत्री उपस्थित होती. रिपोर्टनुसार, कंगना मंडी नाही तर, चंदीगडमधून लोकसभा निवडणूक लढवू शकते. अशी चर्चा रंगत आहे. पण यावर अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

कंगना रनौत हिने आगामी सिनेमे

‘तेजस’ सिनेमानंतर अभिनेत्री कंगना रनौत ‘इमरजेन्सी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा सुरुवातील नोव्हेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता. पण आता सिनेमा 2024 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सिनेमात कंगना रनौत हिच्यासोबत, श्रेयस तळपदे, अनुपम खेर, दिवंगत सतीश कौशिक आणि अभिनेत्री महिमा चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रनौत हिची चर्चा रंगली आहे.

नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.