Kangana Ranaut | परवानगीशिवाय कंगनाच्या घरात घुसलात तर झाडणार गोळी; त्यातूनही वाचलात तर..

कंगनाचा जन्म हिमाचल प्रदेशमधील भांबला याठिकाणी झाला. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गँगस्टर' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा इमर्जन्सी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kangana Ranaut | परवानगीशिवाय कंगनाच्या घरात घुसलात तर झाडणार गोळी; त्यातूनही वाचलात तर..
Kangana RanautImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 8:19 AM

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत तिच्या दमदार अभिनयासोबतच बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. आता कंगना पुन्हा एकदा एका पोस्टमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. यामागचं कारण म्हणजे तिच्या मुंबईतील घराबाहेर लावलेला एक साइन बोर्ड. कंगनाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ तिच्या मुंबईतील घराबाहेरचा असल्याचा म्हटलं जातंय. यामध्ये घराबाहेर एक साइन बोर्ड पहायला मिळतोय. या साइन बोर्डवरील मजकूराने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे.

या साइन बोर्डवर लिहिण्यात आलं आहे, ‘विना परवागनी घरात घुसण्यास मनाई आहे. याचं पालन न करणाऱ्यांवर गोळी झाडली जाईल आणि त्यातूनही वाचलात तर पुन्हा गोळी झाडली जाईल.’ सोशल मीडियावर सध्या हा साइन बोर्ड चांगलाच व्हायरल होत आहे. अशा कारणांमुळे कंगना चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही काही बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधल्यामुळे कंगना वादाचा विषय ठरली होती.

मुंबईसोबतच कंगनाचं मनालीतही आलिशान घर आहे. हे घर इंटेरिअर डिझायनर शबनम गुप्ता यांनी डिझाइन केलं आहे. शबनम यांनी आलिया भट्ट, रणबीर कपूर, मिनी माथूर आणि दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्यासोबतही काम केलं होतं. आपलं घर सजवण्याच्या प्रेमाबद्दल बोलताना कंगनाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या मुंबईच्या घराची झलक दाखवली होती.

हे सुद्धा वाचा

कंगनाचा जन्म हिमाचल प्रदेशमधील भांबला याठिकाणी झाला. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गँगस्टर’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा इमर्जन्सी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कंगना दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबतच अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटासाठी कंगनाने तिची सर्व संपत्ती गहाण ठेवली आहे. याचा खुलासा खुद्द तिनेच केला होता.

इमर्जन्सी या चित्रपटाच्या शूटिंगचा प्रवास काही सोपा नव्हता, असं ती म्हणाली. देशातील विविध भागांमध्ये या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं. तिच या चित्रपटाची निर्मातीसुद्धा असल्याने तिला चित्रपट पूर्ण करण्यासाठी संपत्ती गहाण ठेवावी लागली, असं कंगनाने सांगितलं. “मी या शहरात फक्त 500 रुपये घेऊन आले होते. पुन्हा जर मी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तर मी स्वत:ला पुन्हा खंबीरपणे उभी करू शकते. माझ्यात तेवढा आत्मविश्वास आणि हिंमत आहे. माझ्यासाठी संपत्तीचं फार महत्त्व नाही”, असंही ती आत्मविश्वासाने म्हणाली होती.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.