Gadar 2 | ‘खरेदी केलेले रिव्ह्यू, खोटा प्रचार..’; ‘गदर 2’साठी कंगनाने लिहिलेली पोस्ट चर्चेत

याआधी सलमान खाननेही सनी देओलचं कौतुक केलं. 'ढाई किलोचा हात हा 40 कोटींच्या ओपनिंगच्या बरोबरीचा आहे. सनी पाजी तुम्ही दमदार कामगिरी केली. गदर 2 च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा', असं त्याने लिहिलं.

Gadar 2 | 'खरेदी केलेले रिव्ह्यू, खोटा प्रचार..'; 'गदर 2'साठी कंगनाने लिहिलेली पोस्ट चर्चेत
Kangana Ranaut on Gadar 2Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 5:05 PM

मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाने पहिल्या दिवशीच धमाकेदार कामगिरी आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पदार्पणाच्या दिवशी तब्बल 40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर वीकेंडलाही थिएटरमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. अभिनेता सलमान खाननेही सनी देओलच्या या चित्रपटाची प्रशंसा केली. त्यानंतर आता अभिनेत्री कंगना रनौतनेही ‘गदर 2’साठी खास पोस्ट लिहिली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘गदर 2’ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी केलेली गर्दी पहायला मिळतेय. अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ या चित्रपटासोबत सनी देओलचा चित्रपट प्रदर्शित झाला नसता तर पहिल्याच दिवशी तब्बल 65 ते 70 कोटी रुपयांची कमाई झाली असती, असंही तिने म्हटलंय.

कंगनाने म्हटलंय की कोणत्याही बनावट किंवा खोट्या प्रचाराशिवाय ‘गदर 2’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतोय. तिने सनी देओलला ‘प्रॉपर मॅनली हिरो’ असंही संबोधित केलं आहे. कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, ‘कोणताही माफिया राजकारण नाही, खरेदी केलेले रिव्ह्यू नाही, बनावट प्रचार नाही, मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट तिकिट बुकिंग नाही, कार्टूनसारखे दिसणारे कलाकार नाहीत, योग्य नायक आणि योग्य कथा..’

हे सुद्धा वाचा

2001 मध्ये ‘गदर : एक प्रेम कथा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हासुद्धा बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. आता 22 वर्षांनंतर त्याच्या सीक्वेलसाठी प्रेक्षकांमध्ये तेवढीच क्रेझ पहायला मिळतेय. याविषयी कंगनाने पुढे लिहिलं, ‘सुट्टी विसरा, जरी हा एकच चित्रपट प्रदर्शित झाला असता तरी पहिल्या दिवशी सहज 65 ते 70 कोटी रुपये कमावले असते. पण हा केवळ आर्थिक दुष्काळ नाही जो चित्रपटसृष्टीत पडतोय, तुम्ही लोकांकडे पहा. चित्रपटाने लोकांच्या आयुष्यात उत्साह आणि राष्ट्रवाद परत आणल्याचं पाहून आनंद झाला. तारा सिंग आणि सनी देओल चिरंजीव होवो.’

याआधी सलमान खाननेही सनी देओलचं कौतुक केलं. ‘ढाई किलोचा हात हा 40 कोटींच्या ओपनिंगच्या बरोबरीचा आहे. सनी पाजी तुम्ही दमदार कामगिरी केली. गदर 2 च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा’, असं त्याने लिहिलं.

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ या चित्रपटात सनी देओलने पुन्हा एकदा तारा सिंगची भूमिका साकारली आहे. तर अमीषा पटेल त्याच्या पत्नीच्या म्हणजेच सकिनाच्या भूमिकेत आहे. तर उत्कर्षने तारा सिंग आणि सकिनाचा मुलगा चरणजीत सिंगची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री सिमरत कौरने यामध्ये उत्कर्षच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.