Satish Kaushik | सतीश कौशिक यांच्या निधनाला कंगना रनौत म्हणाली भयानक; ‘ते सर्वात मोठे…’

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त करत अभिनेत्री कंगना रनौत असं का म्हणाली; ज्यामुळे अभिनेत्री पुन्हा आली चर्चेत... सतिश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Satish Kaushik | सतीश कौशिक यांच्या निधनाला कंगना रनौत म्हणाली भयानक; 'ते सर्वात मोठे...'
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 9:58 AM

Kangana On Satish Kaushik Death : अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. सतिश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सतीश यांना गुरुग्राम येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान सतीश कौशिक यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अनेक चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेत्री कंगना रनौत हिने देखील सतीश कौशिक यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे.

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त करत कंगना म्हणाली, ‘या भयानक बातमीसह माझी सकाळ झाली आहे. ते माझे सर्वात मोठे चीयरलीडर होते. एक प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक खऱ्या आयुष्यात मात्र दयाळू आणि उत्तम व्यक्ती होते. त्यांना इमरजेंसी सिनेमात दिग्दर्शक करणं मला आवडलं होतं. त्यांची कायम आठवण येईल ओम शांती…’ सध्या सर्वत्र सतीश कौशिक यांच्या निधनाची चर्चा आहे.

सतीश कौशिक यांना कारमध्ये आला हृदयविकाराचा झटका

सतिश कौशिक कोणाला तरी भेटण्यासाठी दिल्ली याठिकाणी फार्म हाऊसमध्ये गेले होते. तेथून येताना कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

सतीश कौशिक यांचं पार्थिव शरीर सध्या गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. आता त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी दिल्लीतील दीनदयाल रुग्णालयात नेण्यात येणार आहे. जिथे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल. (Satish Kaushik Death)

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक यांचं पार्थिव शरीर मुंबई येथे आणण्यात येणार आहे. सतिश कौशिक यांच्यावर गुरुवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळत आहे. शवविच्छेदनानंतर सतीश कौशिक यांचा मृतदेह मुंबईमध्ये आणणार आहे.

सतीश कौशिक यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. निधनापूर्वी सतीश कौशिक यांनी रंगपंचमीचा आनंद देखील घेतला. होळी पार्टीमध्ये सतीश आनंदी दिसत होते. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर त्यांनी होळीचे फोटो देखील पोस्ट केले होते. फोटोमध्ये त्यांच्यासोबत जावेद अख्तर आणि महिमा चौधरी देखील होती. पण अचानक निधन झाल्यामुळे सेलिब्रिटींसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.