कंगनाचा शशी थरुर यांच्यावर निशाणा, ‘आमच्या प्रेमाला पैशाने खरेदी करण्याचा प्रयत्न करु नका!’
कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर कुढल्याही विषयावर आपले मत मांडायला मागे पुढे पाहात नाही.
मुंबई : कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर कुढल्याही विषयावर आपले मत मांडायला मागे पुढे पाहात नाही. आता तिने शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्या ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शशी थरूर यांनी कमल हासन यांच्या विधानाचे समर्थन केले आहे ज्यात ते म्हणतात की, कमल हासनच्या विचारांचे मी स्वागत करतो घरामध्ये काम करणाऱ्या महिल्यांचा सन्मान केला पाहिजे तसेच शासनाने घरकाम करणार्या महिलांना मासिक पगार द्यावा, ज्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल. (Kangana Ranaut Reaction to Shashi Tharoor’s tweet)
मात्र, हे कंगनाला रूचले नसल्यामुळे तिने या ट्विटवर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, महिलांच्या प्रेमावर टॅग लावू नका. प्रत्येक गोष्टीत व्यवसाय पाहू नका. महिलांना फक्त सन्मान आणि प्रेम द्या. त्यांना फक्त तुमच्या सन्माची आणि तुमच्या प्रेमाची गरज आहे पगाराची नाही.
Don’t put a price tag on sex we have with our love, don’t pay us for mothering our own, we don’t need salary for being the Queens of our own little kingdom our home,stop seeing everything as business. Surrender to your woman she needs all of you not just your love/respect/salary. https://t.co/57PE8UBALM
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 5, 2021
अलीकडेच दिलजीतने आपल्या सुट्टीचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले होते, ज्यावर कंगनाने टाकले होते व्वा भावा देशामध्ये आग लावलीस आणि आता सुट्ट्यांचा आनंद घेतोस. याला म्हणतात लोकल क्रांतिकारी, अशा शब्दात कंगनाने दिलजीतवर प्रहार केला होता. त्यावर दिलजीतने उत्तर दिले आहे की, तुला तुझ्याबद्दल खूप गैरसमज आहे आणि तु काय केले आहे ते आम्ही पंजाबी लोक विसरलो नाहीत लवकरच आम्ही तुला उत्तर देणार आहोत.
नुकताच तापसीने एक ट्विट केले आहे त्यामधून तिने कंगना रनाैतवर (Kangana Ranaut) निशाना साधला आहे. तापसाने ट्विटमध्ये लिहिले आहे की, चला आता कोरोनावरही उपचार आहे पण गैरसमज आणि ओवर कॉन्फिडेंस याचा काहीच उपचार नाही म्हणत तिने कंगनाला टा्र्गेट केले आहे.
संबंधित बातम्या :
Big News | करण जोहरला मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनमध्ये आता गौतम अदाणींची एन्ट्री!
Scoop | आयुष्मान खुराना मुंबईत दाखल, लवकरच करणार नवीव चित्रपटाची घोषणा!
(Kangana Ranaut Reaction to Shashi Tharoor’s tweet)