AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: अब कपडे उतरेंगे तो सबके सामने, लॉक अपमध्ये कोणत्या सेलिब्रेटींचे कपडे उतरवणार कंगना रनावत?

मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने आपले स्थान निर्माण करणारी कंगना आता लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाका उडवून देणार आहे. ती लवकरच ओटीटीवर आपला रिअ‍ॅलटी शो लॉकमधून चर्चेत आली आहे.

Video: अब कपडे उतरेंगे तो सबके सामने, लॉक अपमध्ये कोणत्या सेलिब्रेटींचे कपडे उतरवणार कंगना रनावत?
| Edited By: | Updated on: Feb 17, 2022 | 11:05 PM
Share

मुंबईः आपल्या बेताल वक्तव्यामुळे आणि कुणावरही केलेल्या टीकेमुळे नेहमीच कुणाकुणाशी पंगा घेणारी पंगा गर्ल्स सध्या जोरदार चर्चेत आहे. आपल्या सडेतोड बोलण्यामुळे प्रत्येक गोष्टीवर टीका करणारी कंगना (kangana ranaut) आता येऊ घातलेल्या एका रिअ‍ॅलटी शोमुळे (Reality show) चर्चेत आहे. मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने आपले स्थान निर्माण करणारी कंगना आता लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाका उडवून देणार आहे. ती लवकरच ओटीटीवर आपला रिअ‍ॅलटी शो लॉकमधून ( lockupp) चर्चेत आली आहे.

या रिअ‍ॅलटी शोचा एक ट्रेलर नुकताच तिने आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. ज्यावेळी एकता कपूरने या कार्यक्रमाची घोषणा केली त्यावेळेपासूनच या कार्यक्रमाची उत्सुकता ताणली गेली आहे. या रिअ‍ॅलटी शो मध्ये कंगना आपल्या मोकळ्याढाकळ्या स्वभावासारखीच यामध्ये ती जेलर बनली आहे.

या रिअ‍ॅलटी शोचा ट्रेलर आल्यापासून चाहत्यांनी प्रचंड उत्सुकता लागली आहे, ट्रेलरमध्ये ती म्हणते की, एक ऐसी जगह जहां रहना किसी सपने से कम नहीं, बुरे सपने से कम नहीं, वह है यह लॉकअप। यामुळे तिच्या शोची उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे. या शो मध्ये सेलिब्रेटीची कोणीही काळजी घेणार नाही पण त्यांच्या अडचणी मात्र आम्ही जाणून घेणार आहोत. त्याही पुढे जाऊन तिच्या ती म्हणते की, इसलिए हथकड़ी के साथ इन्हें मिलेगा ऐसे कंटेस्टेंट्स का साथ जिनका यह खून पी जाएंगे। अशा या बेधडक ट्रेलरमुळे चाहत्यांनी 27 तारखेची वाट बघावी लागणार आहे.

कंगना म्हणजे काही बेधडक असणार हे ठरलेलं त्यामुळे या शोच्या ट्रेलरमध्येच तिने आधीच सांगितले आहे की, जे सेलिब्रेटी शोमध्ये येतील आणि ज्यांना बाहेर जायचं नाही त्यांना आपल्या खासगी गोष्टी सांगाव्या लागतील आणि तेही सगळ्यांसमोर. आणखी एक यातून तिने जाहीर केले आहे की, सगळ्यात जास्त वादग्रस्त सेलिब्रेटीजवर 24 तास नजर ठेवण्यासाठीच आम्ही येत आहोत 27 फेब्रुवारीपासून. मात्र या ट्रेलरमध्ये तिने हेही सांगितले आहे की, ते सेलिब्रेटी असले तरी मी म्हणेन तेच त्यांना करावं लागणार आहे. त्यामुळे ट्रेलर बघून तर असं वाटत आहे की, जे सेलिब्रेटी कार्यक्रमात सहभागी होतील त्यांच्यासाठी जेलर कंगना जड जाणार आहे. ट्रेलर बघून अनेकांनी लॉकमध्ये येणाऱ्या सेलिब्रेटींविषयी भविष्यवाणी केली आहे. ती म्हणजे यामध्ये असतील श्वेता तिवारी, शहनाज गिल, कुशाल टंडन, चेतन भगतसारखे आणखी काही कलाकार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही जण या शोच्या मानधनविषयी अजब आकडे सांगत आहेत, कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांना कार्यक्रमाच्या भागासाठी 1 कोटी दिले जाणार आहेत तर कंगनाला पूर्ण शोसाठी 25 कोटी मिळणार असल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या

Video: दीपिका, आलियाचं नाव निघालं अन् कंगनाला मिर्च्या झोंबल्या, शेवटी सवाल विचारणाऱ्यांचे माईक बंद केले, काय घडलं?

आय अ‍ॅम डेड इनसाईड, दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर गर्लफ्रेंड रीना रॉयची भावनिक पोस्ट

Bappi Lahiri Funeral Highlights : मुलगा बप्पाने दिली मुखाग्नी; बप्पीदा पंचतत्वात विलीन विलीन

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.