तापसी पन्नू-स्वरा भास्करला का म्हटलं होतं ‘बी ग्रेड’? अखेर कंगनाने सांगितलं कारण

अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंडैल यांनी तापसी पन्नू, स्वरा भास्कर यांना 'बी ग्रेड' अभिनेत्री असं म्हटलं होतं. ही टीका का केली, यामागचं कारण आता बऱ्याच काळानंतर कंगनाने दिलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती यावर मोकळेपणे व्यक्त झाली.

तापसी पन्नू-स्वरा भास्करला का म्हटलं होतं 'बी ग्रेड'? अखेर कंगनाने सांगितलं कारण
Taapsee, Kangana and SwaraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 26, 2023 | 8:45 AM

मुंबई : 26 ऑक्टोबर 2023 | अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी आणि मतांसाठी ओळखली जाते. यामुळे अनेकदा ती ट्रोलिंगचीही शिकार होते. एका मुलाखतीत कंगनाने स्वरा भास्कर आणि तापसी पन्नू या दोघींना ‘बी ग्रेड’ अभिनेत्री म्हटलं होतं. आता बऱ्याच काळानंतर तिने यामागचं कारण सांगितलं आहे. कंगनाने तिच्या या वक्तव्यावर कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही, मात्र तिने स्वरा आणि तापसीला ‘बी ग्रेड’ का म्हटलं होतं, यामागचं कारण सांगितलं आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने सांगितलं की, तिने ज्या भूमिका सोडल्या होत्या, त्या भूमिका तापसी मागायची. इंडस्ट्रीत यश मिळाल्यानंतर तापसीने अनेकदा माझ्याबद्दल बरंवाईट वक्तव्य केलं होतं, असंही कंगना म्हणाली. त्याचप्रमाणे स्वराच्या मताशी सहमत नसल्याचं कंगनाने स्पष्ट केलं. म्हणूनच या दोघींवर ‘बी ग्रेड’ अभिनेत्रीची टीका केल्याचं बॉलिवूडच्या ‘क्वीन’ने सांगितलं.

तापसीबद्दल काय म्हणाली कंगना?

“तापसीने म्हटलं होतं की कंगनाला डबल फिल्टरची गरज आहे. तिने 2012-13 पर्यंत स्ट्रगल केला आणि जेव्हा 2016 मध्ये तिला यश मिळालं तेव्हा तिने माझ्यावर टीका केली. तेव्हाच माझी बहीण म्हणाली की हे ठीक नाही. जी अभिनेत्री कंगनाची नक्कल करते आणि असे चित्रपट करते जे कंगनाने नाकारले होते, तिच्यापासून प्रभावित होऊन ती तिचं करिअर चालवतेय. अशा व्यक्तीने असं बोलणं ठीक नाही, असं बहीण रंगोली म्हणाली होती. त्यामुळे मला वाटत नाही की तिने म्हटलेलं काही चुकीचं आहे”, असं कंगना म्हणाली.

हे सुद्धा वाचा

“तापसी माझ्यापेक्षा मोठी आहे आणि तरीसुद्ध ती माझ्या कामावर प्रभावित आहे. ती मला स्वत:चा आदर्श मानते. त्यामुळे माझ्यावर अशी अभद्र टिप्पणी करणं अजब आहे. म्हणून माझ्या बहिणीने त्यांना बी ग्रेड म्हटलं होतं. पण माझ्या मनात त्यांच्याविषयी काही द्वेष नाही. ती तिच्या करिअरमध्ये यशस्वी होऊ दे”, असंदेखील कंगनाने स्पष्ट केलं.

स्वराबद्दल कंगनाची प्रतिक्रिया

स्वराबद्दल कंगना पुढे म्हणाली, “तनु वेड्स मनु या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्वरा माझी मैत्रीण होती. ती माझा हात पकडून चालायची. मला अजूनही आठवतंय ती सुरुवातीच्या सीनसाठी मी तिचे केससुद्धा विंचरले होते. मग अचानक तिला माझ्यापासून काय समस्या होऊ लागली. जे लोक फारच उदार आणि सहिष्णू होतात, त्यांना इतरांचे विचार आवडत नाहीत. कदाचित तिच्यासोबत तेच झालंय.”

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.