Pathaan | ‘पठाण’वर कंगना रनौतची आश्चर्यकारक प्रतिक्रिया; नेटकरी म्हणाले “ये क्या हुआ?”

कंगना नेहमीच बॉलिवूडमधील एका गटाविरोधात बोलताना दिसते. मात्र 'पठाण'वर दिलेल्या तिच्या प्रतिक्रियेमुळे शाहरुखच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Pathaan | 'पठाण'वर कंगना रनौतची आश्चर्यकारक प्रतिक्रिया; नेटकरी म्हणाले ये क्या हुआ?
Kangana and Shah Rukh KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 5:29 PM

मुंबई: शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात जबरदस्त कमाई केली. भारताबाहेरही ‘पठाण’ला तुफान प्रतिसाद मिळाला. प्रेक्षक-समीक्षकांकडून ‘पठाण’चं कौतुक होत असतानाच आता बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौतची प्रतिक्रिया समोर आली आहे. कंगना नेहमीच बॉलिवूडमधील एका गटाविरोधात बोलताना दिसते. मात्र ‘पठाण’वर दिलेल्या तिच्या प्रतिक्रियेमुळे शाहरुखच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

कंगनाने नुकताच तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली. यामध्ये तिच्यासोबत सतीश कौशिक आणि अनुपम खेर काम करत आहेत. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानिमित्त कंगनाने पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये कंगनाने ‘पठाण’विषयी वक्तव्य केल्याचं कळतंय. तिने चक्क शाहरुखच्या पठाण चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

“पठाण चांगली कामगिरी करत आहे. असे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले पाहिजेत आणि मला वाटतं की हिंदी चित्रपटवाले जे मागे राहिले आहेत ते प्रत्येकजण आपापल्या परीने पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत”, अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली. तर अनुपम खेर यांनीसुद्धा पठाणविषयी वक्तव्य केलं. “पठाण हा खूप मोठा चित्रपट आहे. खूप मोठ्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवला गेला आहे”, असं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘पठाण’च्या निमित्ताने देशभरातील 25 सिंगल स्क्रीन थिएटर्स पुन्हा उघडण्यात आले आहेत. त्यामुळे ‘पठाण’च्या निमित्ताने बॉलिवूडला नवसंजीवनी मिळाल आहे, असं म्हणायला हरकत नाही. गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडचे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत होते. अशातच ‘पठाण’ने बॉलिवूडसाठी नवी आशा निर्माण केली आहे.

पठाणमध्ये शाहरुखने एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे, जो देशाला शत्रूपासून वाचवण्यासाठी कशाचीच पर्वा करत नाही. तर अभिनेता जॉन अब्राहम यात खलनायकाच्या भूमिकेत आहे. ज्याने स्वत:च्या फायद्यासाठी देशाच्या शत्रूंशी हातमिळवणी केली आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.