‘लग्नाची किंमत मोजून बिग बॉस जिंकू..’; अंकिता लोखंडेबद्दल कंगना रनौतच्या पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष

बिग बॉसच्या घरात अंकिता ज्या पद्धतीने पती विकी जैनशी बोलते किंवा वागते, ते तिच्या सासूला पसंत नसल्याचं त्यांनी काही मुलाखतींमध्ये स्पष्ट केलं. त्यानंतर आता कंगना अंकिताच्या बाजूने उभी राहिली आहे. कंगनाने अंकिताच्या सासूच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

'लग्नाची किंमत मोजून बिग बॉस जिंकू..'; अंकिता लोखंडेबद्दल कंगना रनौतच्या पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष
अंकितासाठी कंगनाची खास पोस्टImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 10, 2024 | 10:33 AM

मुंबई : 10 जानेवारी 2024 | बिग बॉसच्या घरात अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिची पती विकी जैन यांच्यात सतत भांडणं होत असल्याचं पहायला मिळतंय. या भांडणादरम्यान दोघं एकमेकांना असं काही बोलून जातात, ज्यामुळे शोनंतर त्यांचं नातं फार काळ टिकणार नसल्याचा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. अशातच विकी जैनची आई आणि अंकिताची सासू रंजना जैन यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ते सुनेबद्दल बरंच काही बोलताना दिसत आहेत. या सर्व घडामोडींदरम्यान अभिनेत्री कंगना रनौतने अंकिताला तिचा पाठिंबा दर्शविला आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिच्या सासूच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने अंकिताला पाठिंबा दिला आहे.

अंकिता गेल्या 17 वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करतेय. ती बिग बॉसच्या घरात सीनिअर असल्याने तिने तो शो जिंकावा, असं सासू रंजना जैन या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. समर्थ जुरैलसारख्या लोकांची शो जिंकण्याची लायकी आहे का, असंही त्या म्हणतायत. हाच व्हिडीओ कंगनाने शेअर केला आहे.

कंगना रनौतची पोस्ट-

विकी जैनच्या आईच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ शेअर करत कंगनाने लिहिलं, ‘त्यांचं कुटुंब मोडण्यासाठी मीडिया सर्वोत्तम काम करतेय. अंकिता लोखंडेची सासू तिची कशी साथ देतेय, हे ते तुम्हाला दाखवणार नाहीत. व्हिडीओच्या शेवटी ते हसणं खूप आवडलं. हाहाहा.. आंटी खूप क्यूट आहेत. रिॲलिटी शोज येतात आणि जातात पण कुटुंब हे सदैव सोबत असतं. माझी अशी आशा आहे की माझी मैत्रीण अंकिता लोखंडेनं हा शो जिंकावा, पण तिच्या लग्नाची किंमत मोजून नव्हे.’

हे सुद्धा वाचा

विकी जैनची आई बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेरही अनेकदा अंकिताला बरंवाईट बोलताना दिसली. त्यांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. बिग बॉसच्या घरात जेव्हा रंजना यांनी अंकिताची भेट घेतली, तेव्हासुद्धा दोघींमध्ये बाचाबाची झाली होती. त्यामुळे आपल्या लग्नाची किंमत मोजून अंकिताने हा शो जिंकू नये, असं मत कंगनाने मांडलं आहे. कंगना आणि अंकिता यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. कारण अंकिताने कंगनाच्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.