हिंदुत्वाबद्दल केलेल्या ‘त्या’ ट्विटनंतर प्रसिद्ध अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक

चेतन कुमार हा अमेरिकन कन्नड अभिनेता आहे. सोशल मीडियावर तो बऱ्यापैकी सक्रिय असतो. मात्र धर्म आणि समानता या मुद्द्यांवरील ट्विटमुळे तो अनेकदा चर्चेत येतो. 2007 मध्ये त्याने 'आ दिनगालू' या चित्रपटातून पदार्पण केलं होतं.

हिंदुत्वाबद्दल केलेल्या 'त्या' ट्विटनंतर प्रसिद्ध अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक
Chetan KumarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 2:35 PM

बेंगळुरू : कन्नड अभिनेता चेतन कुमार पुन्हा एकदा त्याच्या वादग्रस्त टिप्पणीमुळे चर्चेत आला आहे. चेतनने सोमवारी हिंदुत्वच्या मुद्द्यावरून एक ट्विट केलं होतं. या ट्विटविरोधात बजरंग दलाच्या नेत्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता बेंगळुरूमधील शेषाद्रिपुरम पोलिसांनी चेतनला अटक केली आहे. हिंदुत्वासंदर्भातील चेतनचं ट्विट ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

चेतन कुमारचं वादग्रस्त ट्विट-

‘हिंदुत्व खोटेपणावर आधारित आहे. सावरकर : रावणाचा पराभव केल्यानंतर राम अयोध्येत परतले, तेव्हा भारतीय ‘राष्ट्रा’ची सुरुवात झाली – हे खोटं. 1992 : बाबरी मशीद हे रामाचं जन्मस्थान आहे- खोटं. 2023 : उरीगौडा – नांजेगौडा हे टिपूचे मारेकरी आहेत- खोटं. हिंदुत्वाचा सत्याने पराभव केला जाऊ शकतो- सत्य म्हणजेच समानता’, असं ट्विट चेतनने केलं होतं.

हे सुद्धा वाचा

चेतनच्या या ट्विटला हिंदू संघटनांनी तीव्र विरोध केला. हा हिंदू धर्माचा अपमान असल्याचा आरोप बजरंग दलाने केला. तर बजरंग दलाचे नेते शिव कुमार यांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केली. या एफआयआरनंतर चेतन कुमारला अटक करण्यात आलं.

चेतन कुमारने याआधीही अनेकदा धर्मावरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ या चित्रपटाविरोधातील वक्तव्यानंतरही केस दाखल करण्यात आली होती. त्यावेळी चेतन कुमारवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाला होता. कांतारा या चित्रपटातील भूत कोलाच्या धार्मिक प्रथेविरोधात त्याने टिप्पणी केली होती.

चेतन कुमार हा अमेरिकन कन्नड अभिनेता आहे. सोशल मीडियावर तो बऱ्यापैकी सक्रिय असतो. मात्र धर्म आणि समानता या मुद्द्यांवरील ट्विटमुळे तो अनेकदा चर्चेत येतो. 2007 मध्ये त्याने ‘आ दिनगालू’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. 2013 मध्ये त्याने ‘हिट मैना’ या चित्रपटातही त्याने दमदार भूमिका साकारली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.