प्रसिद्ध अभिनेत्रीने रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास, पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली

अभिनेते ज्युनियर महमूद यांच्या निधनानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास... कलाविश्वात शोककळा... खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या निधनाची चर्चा

प्रसिद्ध अभिनेत्रीने रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास, पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली
Follow us
| Updated on: Dec 09, 2023 | 9:06 AM

मुंबई | 9 डिसेंबर 2023 : प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री लिलावती यांचं निधन झालं आहे. लिलावती यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लिलावती यांनी तामिळ आणि तेलुगूसह 600 हून अधिक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्री लिलावती यांचे नेलमंगला येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारा दरम्यान लिलावती यांचं निधन झालं आहे. लिलावती यांच्या निधनानंतर चाहते आणि सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला. लिलावती यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखा डोंगर कोसळला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त लिलावती यांच्या निधनाची चर्चा रंगली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही दिवसांपासून लिलावती यांची प्रकृती खालावली होती. वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे त्रस्त झालेल्या लिलावती यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 85 वर्षीय लिलावती दीर्घ आजाराने त्रस्त होत्या.

अनेक सिनेमांमध्ये एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. लिलावती यांचा मुलगा विनोद राज देखील अभिनेता आहे. लिलावती यांनी ‘नागकन्निके’ सिनेमात सखी या भूमिकेला न्याय देत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर लिलावती यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.

हे सुद्धा वाचा

लिलावती यांनी दक्षिण भारतीय भाषांमधील अनेक लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केले आहे. लिलावती यांची प्रकती गंभीर असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली

प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री लीलावती यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सच्या (ट्विटर) माध्यमातून शोक व्यक्त केला. मोदी म्हणाले. “महान कन्नड अभिनेत्री लिलावती यांच्या निधनाबद्दल ऐकून दु:ख झालं. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये आपल्या अष्टपैलू अभिनयाने रुपेरी पडद्याची शोभा वाढवली. त्यांच्या विविध भूमिका आणि उल्लेखनीय प्रतिभा नेहमीच स्मरणात राहिल. ” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.