हद्दच केली पार! प्रसिद्ध रॅपरने बर्थडे पार्टीत न्यूड महिलांच्या अंगावर सर्व्ह केले पदार्थ, 9 वर्षांच्या मुलीसमोर कृत्य

हे पाहून नेटकऱ्यांना मोठा धक्काच बसला. न्यूड महिलांच्या शरीरावर अशा पद्धतीने खाद्यपदार्थ ठेवून सर्व्ह करणं आणि त्यातही नऊ वर्षांच्या मुलीला तिथे घेऊन जाणं हे कितपत योग्य आहे, असा सवाल नेटकऱ्यांनी केला.

हद्दच केली पार! प्रसिद्ध रॅपरने बर्थडे पार्टीत न्यूड महिलांच्या अंगावर सर्व्ह केले पदार्थ, 9 वर्षांच्या मुलीसमोर कृत्य
Kanye WestImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 5:47 PM

लॉस एंजेलिस : प्रसिद्ध अमेरिकन रॅपर आणि गायक कान्ये वेस्ट (Kanye West) याने 10 जून रोजी 46 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त त्याने जंगी पार्टींचं आयोजन केलं होतं. या पार्टीतील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. कारण या पार्टील आलेल्या पाहुण्यांसाठी न्यूड महिलांवर जपानी डिश सुशी सर्व्ह करण्यात आली होती. इतकंच नव्हे तर या पार्टीला कान्ये त्याच्या नऊ वर्षांच्या मुलीलाही घेऊन गेला होता. त्यामुळे नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वाढदिवसाच्या एक दिवस आधी म्हणजेच 9 जून रोजी कान्येनं लॉस एंजिलिसमध्ये पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी बरेच सेलिब्रिटी पार्टीला उपस्थित होते.

नेमकं काय घडलं?

कान्येच्या बर्थडे पार्टीतील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांना समजलं की त्या पार्टीत विवस्त्र असलेल्या महिलांच्या अंगावर सुशीसारखे पदार्थ ठेवण्यात आले होतं. टेबलवर एक महिला बिकिनी घालून झोपलेली पहायला मिळाली आणि तिच्या शरीरावरील विविध ठिकाणी सुशीचे प्लेट ठेवण्यात आले होते. पार्टीला उपस्थित असलेले पाहुणे त्या महिलेजवळ येऊन तिच्या शरीरावरील प्लेट्समधून सुशी उचलून खात होते. अशा प्रकारे सुशी सर्व्ह करण्याची ही जपानी पद्धत असल्याचंही म्हटलं जात आहे. ज्याला ‘न्योतैमोरी’ किंवा ‘बॉडी सुशी’ या नावाने ओळखलं जातं.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

सर्वांत आधी कान्येला नेटकऱ्यांनी यासाठी सुनावलं कारण कोणत्याही महिलेला अशा पद्धतीची वागणूक देणं हे चुकीचं आणि स्त्रीविरोधी आहे. बर्थडे पार्टीसाठी अशी कल्पना सुचूच कशी शकते, असा सवाल नेटकऱ्यांनी केला. त्यानंतर काहींची नजर पार्टीतील आणखी एका फोटो आणि व्हिडीओवर गेली. त्यामध्ये कान्येची पत्नी बियांका सेन्सरी (Bianca Censori) आणि त्याची नऊ वर्षांची मुलगी नॉर्थ तिथे उपस्थित होती. नॉर्थ ही कान्ये आणि किम कर्दाशियनची मुलगी आहे. तर बियांका तिची सावत्र आई आहे. आणखी एका व्हिडीओमध्ये नॉर्थ स्वत: त्या महिलेच्या शरीरावरील प्लेटमध्ये ठेवलेली सुशी उचलून बियांकाला देताना दिसते.

पहा व्हिडीओ

हे पाहून नेटकऱ्यांना मोठा धक्काच बसला. न्यूड महिलांच्या शरीरावर अशा पद्धतीने खाद्यपदार्थ ठेवून सर्व्ह करणं आणि त्यातही नऊ वर्षांच्या मुलीला तिथे घेऊन जाणं हे कितपत योग्य आहे, असा सवाल नेटकऱ्यांनी केला. या फोटो आणि व्हिडीओवरून कान्येला जोरदार ट्रोल केलं जातंय. याप्रकरणी अद्याप कान्ये, नॉर्थ किंवा बियांकाकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.