कपिल शर्मा मुंबई क्राइम ब्रँचच्या ऑफिसमध्ये, दिलीप छाबरियाविरोधात जबाब देणार!

कपिल शर्मा (Kapil Sharma) मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचला आहे.

कपिल शर्मा मुंबई क्राइम ब्रँचच्या ऑफिसमध्ये, दिलीप छाबरियाविरोधात जबाब देणार!
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 6:13 PM

मुंबई :  अभिनेता कपिल शर्मा आज (Kapil Sharma) मुंबई क्राइम ब्रँचच्या कार्यालयात पोहोचला होता. येथे तो कार डिझायनर दिलीप छाबरिया (Dilip Chhabria) विरोधात जबाब देण्यासाठी गेला होता. कपिलने दिलीप छाबरियाकडे व्हॅनिटी व्हॅन तयार करण्यासाठी पैसे दिले होते पण त्यांला व्हॅनिटी व्हॅन मिळाली नाही. ज्यामुळे कपिल शर्माने मुंबई पोलिसात दिलीप छाबरिया विरोधात फिर्याद दिली होती. दिलीप छाबरियाला 28 डिसेंबर रोजी फसवणूक  प्रकरणात अटक केली. दिलीप छाबड़ियाला 7 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. (Kapil Sharma arrives at Mumbai Crime Branch office)

यासर्व प्रकरणावर कपिल शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. कपिलचे म्हणणे आहे की, दिलीप छाबरिया  यांच्याकडे 2017 साली एक व्हॅनिटी व्हॅन ऑर्डर केली होती मात्र, त्यांना गाड्यांच्या घोटाळासंदर्भात एका केस मध्ये अटक केलेली आहे. त्याचसंदर्भात स्टेटमेंट देण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात गेलो होतो.

कोण आहे दिलीप छाबरिया

दिलीप छाबरिया हे देशातील एक सुप्रसिद्ध कार डिझायनर आहेत. सेलिब्रिटी आणि श्रीमंत लोकांच्या कार डिझाईन करण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. शाहरुख खानची व्हॅनिटी व्हॅनही दिलीप यांनी डिझाइन केली होती. क्रिकेटर दिनेश कार्तिकनेही दिलीपविरोधात 2015 मध्ये गुन्हा दाखल केला होता. दिनेश कार्तिकचे म्हणणे होते की, दिलीप छाबरिया यांना पाच लाख रुपये देऊनही त्याने काम योग्य केले नसल्याचा आरोप होता.

Dilip Chhabria

मुंबई पोलिसांनी डिझायनर कार खरेदी, विक्री आणि फायनान्स करुन लोकांची कोट्यावधींची फसवणूक केल्याचा गुन्हा उघडकीस आणला आहे. हे रॅकेट देशातील अनेक राज्यात पसरल्याचा अंदाज आहे. या फसवणूकच्या गुन्ह्यात प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरिया ह्याला अटक करण्यात आली आहे. दिलीप छाबरिया हा डिझाईन्स प्राव्हेट लिमीटेड या कंपनीचा मालक आहे.

रीमन पॉईंट येथील ट्रायडंट हॉटेलजवळ डी. सी. अवंती गाडी येणार आहे. या गाडीचा नंबर बोगस आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या टीमने 17 डिसेंबरला सापळा रचला. मात्र त्या दिवशी ही गाडी आली नाही. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 डिसेंबरला ताज हॉटेल, कुलाबा या ठिकाणी पुन्हा सापळा रचण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

Kapil Sharma | खरोखरच ‘कपिल शर्मा’कडे बायकोला गिफ्ट देण्यासाठी पैसे नाहीत?

(Kapil Sharma arrives at Mumbai Crime Branch office)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.