गडगंज श्रीमंत आहे कपूर कुटुंबातील ‘या’ मुलाची गर्लफ्रेंड, लवकरच होणार करिष्मा – करीना यांची वहिनी?

Kapoor Family : अफाट श्रीमंत मुलीला कपूर कुटुंबाचा लेक करतोय डेट, कोण आहे 'ती'? कपूर कुटुंबात लवकरच वाजणार सनई - चौघडे? सध्या सर्वत्र कपूर कुटुंबाची चर्चा... एक फोटोमुळे सर्वत्र चर्चांना उधाण... 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री होती त्याची एक्स-गर्लफ्रेंड...

गडगंज श्रीमंत आहे कपूर कुटुंबातील 'या' मुलाची गर्लफ्रेंड, लवकरच होणार करिष्मा - करीना यांची वहिनी?
Follow us
| Updated on: Nov 16, 2023 | 3:44 PM

Kapoor Family : कपूर कुटुंब हे सिनेविश्वातील प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कपूर कुटुंब बॉलिवूडवर राज्य करत आहे. कपूर कुटुंबाने आजपर्यंत अनेक प्रसिद्ध कलाकार इंडस्ट्रीला दिले आहे. कपूर कुटुंबाची चर्चा देखील कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. आता देखील कपूर कुटुंबातील एका मुलाच्या खासगी आयुष्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. सध्या ज्या मुलाची चर्चा रंगत आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेत्री करिश्मा, करीना यांचा चुलत भाऊ आदर जैन आहे.

सध्या सर्वत्र आदर जैन याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे. अभिनेत्री तारा सुतारिया हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. सध्या आदर जैन, अलेखा अडवाणी नावाच्या एका अफाट श्रीमंत मुलीला डेट करत आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Aadar Jain (@aadarjain)

आदर याने गर्लफ्रेंडच्या हातात हात घेऊन एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर आदर याच्या खासगी आयुष्याच्या चर्चा तुफान रंगू लागल्या. त्यामुळे आदर जैन याची गर्लफ्रेंड कोण आणि ती काय करते अशा चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगत आहे.

आदर जैन याची गर्लफ्रेंड अलेखा Way Well ची क्रिएटीव्ह दिग्दर्शक आहे. वेलनेस व्यवसायाशिवाय अलेखा हिने क्लोदिंग आणि ज्वलरीच्या अनेक ब्रॉन्डसाठी मॉडलिंग देखील केलं आहे. अलेखा हिच्या सोशल मीडियाच्या माध्यामातून तिची ओळख पटली आहे.

अलेखा हिने फक्त मुंबईमध्ये नाही तर परदेशात देखील काम केलं आहे. आता अलेखा व्यवसाय संभाळत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अलेखा आणि तारा दोघी मैत्रीणी देखील आहेत. अलेखा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अलेखा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सांगायचं झालं तर, करीना कपूर हिने आयोजीत केलेल्या दिवाळी पार्टीसाठी आदर आणि अलेखा एकत्र पोहोचले होते. दोघांनी देखील त्यांच्या नात्याची कबूली सर्वांसमोर दिली आहे. त्यामुळे दोघे कधी विवाहबंधनात अडकतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.