Karan Johar | ‘आम्ही सर्वजण खोटारडे..’; बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी करण जोहरचा धक्कादायक खुलासा

विशेष म्हणजे बॉलिवूड स्टार्स त्यांच्या चित्रपटांविषयीच्या सोशल मीडिया रिव्ह्यूमध्ये प्रामाणिक नसतात असाही खुलासा करणने यावेळी केला आहे. त्याचसोबत बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दलही त्याने धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

Karan Johar | 'आम्ही सर्वजण खोटारडे..'; बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी करण जोहरचा धक्कादायक खुलासा
Karan JoharImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 11:40 AM

मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : निर्माता दिग्दर्शक करण जोहरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित विविध मुद्द्यांवर मोकळेपणे वक्तव्य केलं. करणला ‘केजो’ म्हटलेलं का आवडत नाही, आरोप सुकेश चंद्रशेखरच्या बायोपिकमध्ये कोण मुख्य भूमिका साकारू शकतं, कंगनाच्या चित्रपटाविषयी त्याला काय वाटतं याविषयी त्याने सांगितलं. विशेष म्हणजे बॉलिवूड स्टार्स त्यांच्या चित्रपटांविषयीच्या सोशल मीडिया रिव्ह्यूमध्ये प्रामाणिक नसतात असाही खुलासा करणने यावेळी केला आहे. त्याचसोबत बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दलही त्याने धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

केजो की नेपो?

रॅपिड फायर प्रश्नांदरम्यान करणला विचारण्यात आलं की, “तुला दिलेलं कोणतं नाव आवडत नाही, केजो की नेपो?” त्यावर करण म्हणाला, “जेव्हा लोक मला केजो म्हणतात तेव्हा मला खूप चीड येते.” यावेळी करणला काही बॉलिवूड चित्रपटांच्या अपयशाबद्दलही विचारलं गेलं. ‘आदिपुरुष’, ‘किसी का भाई किसी की जान’, ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’ यांसारख्या चित्रपटांचं नेमकं कुठे चुकलं, असं त्याला विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना करण म्हणाला, “लाल सिंग चड्ढाशिवाय मी तुम्ही सांगितलेले दुसरे चित्रपट अद्याप पाहिले नाहीत. मला माहीत नाही की कुठे चुकलं. पण आमिरचा चित्रपट पाहताना मला खूप मजा आली. शेवटचा भाग बघताना माझ्या डोळ्यात अश्रू होते.”

कोण कोणाचे बायोपिक साकारू शकेल?

‘कॉफी विथ करण’ या त्याच्या शोमध्ये फिल्म इंडस्ट्रीतून नसलेली एखादी सेलिब्रिटी बोलवायचं असल्यास कोणाला बोलवणार असं विचारलं असता करणने महेंद्र सिंह धोनीचं नाव घेतलं. बायोपिक्सबद्दल बोलताना त्याने काही कलाकारांची नावं सुचवली. त्यात ऐश्वर्या रायने नीता अंबानी, पंकज त्रिपाठी यांनी सुकेश चंद्रशेखर, अमिताभ बच्चन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रणबीर कपूरने राहुल गांधी आणि विकी कौशलने विराट कोहलीची भूमिका साकारावी, अशी इच्छा व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

बॉक्स ऑफिस कलेक्शनचं सत्य

यावेळी करणने कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचा आवर्जून उल्लेख केला. एखाद्या राजकीय घटनेवर चित्रपट बनवण्याचा विचार कधी केला का, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. तेव्हा करण म्हणाला, “इमर्जन्सी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि त्यासाठी मी खूप उत्सुक आहे.” यावेळी त्याने बॉलिवूड सेलिब्रिटी हे त्यांच्या रिव्ह्यूबद्दल प्रामाणिक नसल्याचा खुलासा केला. “आम्ही सगळे खोटारडे आहोत. आम्ही सगळे धादांत खोटारडे आहोत”, असं तो म्हणाला. त्याचप्रमाणे बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी छेडछाड होत असल्याचंही त्याने कबूल केलं.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....