सलमान खान याच्या ‘या’ कृत्यामुळे करण जोहर थेट लागला रडायला, भाईजान याने थेट
सलमान खान याने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. सलमान खान याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सलमान खान याचा टायगर 3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. सलमान खान याचा चाहता वर्ग जबरदस्त मोठा आहे. सलमान खान याचा दिवाळीमध्ये टायगर 3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सलमान खान याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये सलमान खान याच्यासोबत कतरिना कैफ (Katrina Kaif) ही महत्वाच्या भूमिकेत दिसेल. सलमान खान याचा काही दिवसांपूर्वीच किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला.
विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केला. सलमान खान याचा टायगर 3 हा चित्रपट बहुचर्चित चित्रपट आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. करण जोहर याने देखील एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला. काही दिवसांपूर्वीच करण जोहर याचा राॅकी आैर रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने धमाका केला.
राॅकी आैर रानी की प्रेम कहानी या करण जोहर याच्या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह हे मुख्य भूमिकेत दिसले. विशेष म्हणजे या चित्रपटाने नक्कीच तगडी कमाई केलीये. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना आलिया आणि रणवीर सिंह हे दिसले. या चित्रपटातील गाण्याचे शूटिंग कश्मीर येथे करण्यात आले. राहा हिच्या जन्मानंतर आलियाने गाण्याचे शूटिंग पूर्ण केले.
आता नुकताच करण जोहर याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये करण याने सलमान खान याच्याबद्दल हैराण करणारा खुलासा केलाय. करण जोहर म्हणाला की, अमन मेहराच्या भूमिकेसाठी मला कोणताच अभिनेता भेटत नव्हता. सैफ अली खान याने या भूमिकेसाठी नकार दिला. शेवटी या भूमिकेसाठी मी सलमान खान याच्यासोबत बोललो. त्यावेळी त्याने मला भेटण्यास जब प्यार किसी से होता है चित्रपटाच्या सेटवर बोलावले.
सलमान खान तिथे 9 वाजता सकाळी शूटिंगला येणार असल्याने मी सेटवर 8.30 ला पोहचलो. मात्र, त्यावेळी थेट संध्याकाळीच सलमान खान आला. त्यानंतर त्याने मला घरी बोलावले. मी त्याला स्क्रीप्ट वाचून दाखवली. शेवटी सलमान खान याने अमन मेहराच्या भूमिकेसाठी होकार दिला. शूटिंगच्या वेळी आम्ही साजनजी घर आए गाण्याचे शूटिंग करत होतो.
सलमान खान सेटवर फाटलेली जीन्स आणि काळा शर्ट घालून आला. सलमान खान याच्यासाठी खास सूट शिकवण्यात आला. मात्र, सलमान खान थेट म्हणाला की, यापूर्वी कोणीही हे केले नाही पण आता मला करायचे आहे आणि या गाण्यात मी हिच जीन्स आणि शर्ट घालणार आहे. मला त्याला काही बोलण्यासही भीती वाटत होती. परंतू नवर देव फाटलेल्या जीन्स आणि शर्टमध्ये चांगला दिसणार नव्हता.
मी त्याला ठिक आहे म्हटले, परंतू भव्य सेट तयार केलेला काजोल हिने खूप सुंदर घागरा घातलेला आणि हे कसे चालणार हे मला कळत नव्हते. मी शेवटी रडलो. मी सलमान खान याच्यासमोर ढसाढसा रडलो. शेवटी सलमान खान म्हणाला की, ठिक आहे मी सूट घालतो पण तू अगोदर तुझे हे रडणे बंद कर.